चोपडा महाविद्यालयात ‘लोकमान्य टिळक पुण्यतिथी’ व ‘लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती’ साजरी

34
Advertisements

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमान्य टिळक पुण्यतिथी’ व ‘लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती’ साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, सौ.एम.टी.शिंदे, डॉ.ए.बी. सूर्यवंशी तसेच इतिहास विभाग प्रमुख सौ. एस.बी.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुनीता बी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी भावना कोळी, जयश्री बारेला, गंगा करणकाळे, दिपाली राजपूत, सिमरन तडवी तसेच नेहा पाटील या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थीनींचा उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, ‘लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कथा व कादंबरी साहित्य वास्तवपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी वाचन करून महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी व त्यांचे विचार अंमलात आणायला हवेत.’यावेळी त्यांनी ‘स्मशानातील सोनं’ व ‘डोळे’ या अण्णाभाऊ साठे यांच्या कथांचे कथन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘महाविद्यालयाच्या उपक्रमशीलतेमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, त्यामुळे अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायला हवा.स्वातंत्र्य मिळवून देण्यात लोकमान्य टिळकांचे अनमोल योगदान आहे. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी व पोवाडयाच्या माध्यमातून समाज जागृती केली. अशा महापुरुषांचे विचार आजच्या तरुणांनी आत्मसात करायला हवेत’.
या कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथपाल डॉ. व्ही. आर. कांबळे, डॉ.डी.एस. पाटील, डॉ.आर.आर.पाटील, डॉ.एम.बी.पाटील, शुभांगी पाटील आदि प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एम.एल. भुसारे, जी.बी. बडगुजर, नितेश सोनवणे, विजय शुक्ल, कल्पेश पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोनाली राणे या विद्यार्थिनीने केले तर आभार जी.बी.बडगुजर यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.