चिमुरात लपून छपून अवैधरित्या दारू विकणाऱ्याला अटक

    50
    Advertisements

    ?चिमूर पोलिसांची कारवाई -3लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

    ✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमुर(दि.7ऑगस्ट):-चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाली तेव्हा पासून अवैध रित्या दारू विक्री ला उत आला होता, यात निहमित दारू विकणारे बदमान झाले आहेत, मात्र बरेच व्यक्ती छुप्या मार्गाने या वैवसायत गुंतलेले असल्याची माहिती चिमूर पोलिसांना प्राप्त झाल्या नंतर पोलिसांनी सुद्धा आपली कार्यपद्धती बदलून दारू विकर्त्यांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. याच अभियानांतर्गत आज एका इसमास अटक करून 3 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    पोलिसांची कार्यपद्धती बदलल्यामुळे पोलीस केव्हाही, कोणत्याही वाहनाने येऊ शकतात ही धास्ती अवैध दारू विकर्त्यांनी घेतली आहे.अनेक दिवसापासून चिमूर पोलीस दारूबंदीच्या कारवाही करीत आहेत, परंतु अवैद्य दारूविक्रेते हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अवैद्य दारू आणून विक्री करीत आहे अश्यावरही चिमूर पोलिसांनी दिवस रात्र एक करून लपून छपून कारवाही करून दारू विक्रेत्यांचे मुसके बांधले आहे. परंतु नवीन नवीन दारू विक्रीच्या व्यवसायात उतरलेले इसम हे पोलिसांच्या नजरेत न येता छुप्या मार्गावर चिमुरात दारू विक्री करिता आणून विक्री करीत आहे अश्याच एका छुप्या रुस्तमला पकडण्यासाठी चिमूर पोलिसांनी नवीन युक्ती लावून खाजगी वाहनाचा वापर करून मिळालेल्या माहितीवर पाळत ठेऊन असता एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी अस्तिलो झेन क्र MH 34 AM 4361 ही चिमुरकडे जाताना दिसताक्षणी तिचा पाठलाग केला. गाडी चालकाने सदरची गाडी थांबवून अंधारात पळ काढला तेव्हा सदर गाडीची पाहणी केली असता गाडीचे आत विदेशी दारूचा मुद्देमाल असा एकूण 3,37,500 रु. चा मिळून आल्याने गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी श्यामराव कवडुजी मुरलेली उर्फ श्यामराव मुळे रा वडाळा पैकू चिमूर यास अटक करण्यात आली.

    सदरची कारवाही  उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर अनुज तारे , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे मार्गदर्शनात नापोशी किशोर बोढे, पोशी सचिन गजभिये, सतीश झिलपे, विजय उपरे यांनी पार पाडली.