चिमूर – चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या लावारी येथील आत्राम यांची मुलगी सौ करिष्मा धर्मेजवार (वय ३० वर्ष ) ची तब्बेत दिनांक २ ऑगस्ट च्या रात्री १० वा दरम्यान अचानक बिघडली असता गोपीचंद आत्राम यांनी सरळ आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना रात्री फोन करून आपबिती सांगीतली. तेव्हा तात्काळ आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी लावारी येथे वाहन पाठविले. त्यानंतर रुग्णास उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचार भरती करण्यात आले. उपचार सुरु आहे.
लावारी छोटस गाव असून येथील गोपीचंद आत्राम यांच्या विवाहित मुलीची रात्री १० वा तब्बेत बिघडली. नेरी किंवा चिमूर ला उपचारासाठी जाण्यासाठी साधन नव्हते. यांना त्यांना विचारले. परंतुत्यांना वाहन मिळाले नाही.
तेव्हा अखेर आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना फोन करून मुली च्या तब्बेतीची माहिती दिली.आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी तात्काळ प्रफुल कोलते यांना लावारी येथील महिला रुग्णाच्या उपचारासाठी वाहन पाठविण्याची सूचना केली. प्रफुल कोलते यांनी तात्काळ स्वतः चे वाहन लावारी साठी पाठविले. यावेळी लोहारा चे शैलेंद्र पाटील यांनी सुद्धा सहकार्य केले.आत्राम यांच्या विवाहित मुलीस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. सुरळीत उपचार सुरु आहे.
गोपीचंद आत्राम यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे आभार व्यक्त करीत आमदार बंटीभाऊ भांगडिया दिन दुबळ्या, गोर गरीब जनतेच्या मदतीसाठी मदत करणारे आमदार असल्याचे सांगितले.