✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. १३ ऑगस्ट) आर. पी. उत्तरवार कुटीर रुग्णालयाच्या जुन्या व जीर्ण इमारतीला गळती लागली असल्याने सदर इमारत कधीही ढासळून जीवितहानी होऊ शकते त्यामुळे अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत रुग्णालय स्थलांतर करण्यात यावं या मागणीसाठी ३१ जुलै रोजी उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश मांडण यांना निवेदनाद्वारे १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनापूर्वी स्थलांतर करण्यात यावं अन्यथा स्वतंत्र दिनी रुग्णालयासमोर झोपेची सोंग घेतलेल्या आरोग्य विभागाला जाग करण्यासाठी डफली बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा आजाद समाज पार्टी (भीम आर्मी) यांच्याकडून देण्यात आला होता परंतु आरोग्य विभागाकडून निवेदन कर्त्यांसोबत कुठलीही चर्चा किंवा लेखी आश्वासन रुग्णालय स्थलांतराच्या बाबतीत कुठली हालचाल होताना दिसत नाही त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास काही कमी जास्त झाल्यास त्यास आरोग्य विभाग जबाबदार राहील.
असा इशारा निवेदनामार्फत पोलीस स्टेशन उमरखेड यांना आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुकाप्रमुख देवानंद पाईकराव, उमरखेड शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर, संभाजी हापसे, किरण दवणे, भागोराव धुळे यांनी दिला
—-
याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना ३१ जुलै २०२४ रोजी निवेदन दिले होते परंतु आझाद समाज पार्टी सोबत आरोग्य विभागाकडून नवीन इमारतीत स्थलांतराबाबत कुठलिही चर्चा करण्यात आली नाही त्यामुळे ठरल्याप्रमाणे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ग्रामीण रुग्णालयासमोर “डफली” बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. – प्रफुल दिवेकर, ( शहराध्यक्ष आजाद समाज पार्टी, उमरखेड)