धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गणवेश वितरण करण्यात आले.श्री सावता माळी समाज सुधारणा मंडळ मोठा माळीवाडा धरणगाव यांच्याकडून ११ गणवेश,शाळेचे माजी लिपिक आर बी पाटील भाऊसाहेब यांच्याकडून ५ गणवेश, शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांच्याकडून २ गणवेश, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे यांच्याकडून ५ गणवेश, शाळेतील माजी विद्यार्थी शुभम गुलाब महाजन यांच्याकडून ५ गणवेश शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना देण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी सर्व गणवेश भेट देणाऱ्या दात्यांचे ऋण व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांना गणवेश मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. याप्रसंगी नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एम बी मोरे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, बालाजी रेडिमेट चे संचालक नितीन महाजन तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.