चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय ग्रंथालायशास्त्राचे जनक ‘डॉ.एस.आर.रंगनाथान यांची जयंती’ व ‘ग्रंथपाल दिवस’ साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांच्या हस्ते रंगनाथन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.व्ही.आर.कांबळे यांनी करून दिले.यावेळी त्यांनी डॉ.एस.आर.रंगनाथान यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती सादर करतांना म्हणाले की, ‘डॉ.एस आर रंगनाथन यांच्यामुळेच ग्रंथालय व माहिती शास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊन त्यांच्या तत्त्वज्ञानावरच ग्रंथालय शास्त्राची इमारत उभी आहे. म्हणून त्यांचे महत्त्व आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा अबाधित आहे’.
यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. डी.एस. पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की “संस्कारांतूनच संस्कृती निर्माण होते. नुसतं वाचणं, म्हणजे वाचनसंस्कृती नव्हे. वाचनातून वर्तनबदल अपेक्षित आहे. ग्रंथालयाचं पुस्तक वेळेत परत करणं, हाही वाचनसंस्कृतीचाच भाग आहे. ”
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए.वाघ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. प्रत्येकाने जास्तीत जास्त प्रमाणात वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके,संदर्भ ग्रंथ व इतर आवश्यक असलेली माहिती जास्तीत जास्त प्रमाणात वाचन करावी त्यातूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते.”
या कार्यक्रमासाठी सौ.एम. टी. शिंदे, ग्रंथालय समिती प्रमुख डॉ.ए.बी.सूर्यवंशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक पी. एस. पाडवी, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी.एम.पाटील, सौ.सुनीता पाटील, डॉ.आर.आर.पाटील, डॉ. मुकेश पाटील, श्री. शिरीष ठाकरे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ.व्ही. आर. कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. आर. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागातील सौ. अश्विनी जाधव, शशिकांत चौधरी,अमोल पवार यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.