✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड:- (दिनांक २२ ऑगस्ट)
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आजाद समाज पार्टीने विरोध दर्शवित भारत बंद मध्ये उमरखेड आजाद समाज पार्टीने आवाहन केल्याने आजच्या बंदला उमरखेडात प्रतिसाद मिळाला असून याचे पडसाद व्यापारी वर्गावर पडल्याचे दिसून आले आहे .
सर्वोच्च न्यायालयाने २ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय संविधान विरोधी असून या निर्णयाच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या वर्गातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने २१ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या भारत बंदला आझाद समाज पार्टी उमरखेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना निवेदनाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी,अनुचित जाती जनजातीचे उपवर्गीकरण व क्रीमियरच्या निकालाचा निर्णय वापस घ्यावा अशी मागणी केलीआहे .आज या भारत बंदचे पडसाद उमरखेड शहरात उमटले आहे.
आजाद समाज पार्टीचे उमरखेड तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, महासचिव संतोष जोगदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष प्रफुल दिवेकर, गोलू मुनेश्वर, कुलदीप खडसे, अशोकराव धुळे, किरण दवणे, पंकज धोंगडे, सुमित धोंगडे, तुम्हा हापसे, प्रकाश वावळे, अरविंद धोंगडे, मुजीब लाला, भागोराव धुळे, पुष्पाराज अडागळे, प्रभू काळबांडे, हर्षदीप काळबांडे, शुद्धोधन काळबांडे, समाधान राऊत, सुभाष हापसे, मनोज धुळध्वज, सुनील धुळे, दीपक काळबांडे, आबा गायकवाड,अजय दवणे, श्रावण खंदारे, संघर्ष चौरे विजय दवणे, माधव खंदारे, बाळू खंदारे, प्रेमानंद भगत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.