चिमूर येथे वाचनालय बांधकाम साठी तीन कोटी तर व्यापारी गाळ्यासह सभागृहाचे बांधकामासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर-आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाला यश

70
Advertisements

 

चिमूर-नगर परिषद क्षेत्रात ई लायब्ररी साहित्य व सोई सुविधा युक्त वाचनालय बांधकाम करने साठी तीन कोटी तर चिमूर नगर परिषद क्षेत्रात व्यापारी संकुल व्यापारी गाळ्यासह सभागृहाचे बांधकाम करने साठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत.

चिमूर शहरात तालुक्यातील अनेक विद्यार्थी तहसील कार्यालय चिमूर येथील अभ्यासिकेत तसेच इतर ठिकाणी अभ्यासाकरिता येतात चिमूर तालुक्यातील अनेक अनेक विद्यार्थी या वाचनालयाच्या माध्यमातून उच्च पदावर सुद्धा गेली आहेत.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी त्या विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता चिमूर येथे सर्व सोई सुविधायुक्त वाचनालय निर्माण व्हावे याकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा केला, त्या पाठपुराव्याला यश आले असून नगर परिषदाना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत तब्बल तीन कोटी रुपये निधी मंजूर झाले असून लवकरच चिमूर शहरात भव्यदिव्य सर्व सोई सुविधायुक्त वाचनालय निर्माण होणार असून चिमूर तालुक्यातील अनेक विद्यार्थांना अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच चिमूर नगर परिषद क्षेत्रात व्यापारी बांधवांची अडचण लक्षात घेता चिमूर येथे दोन कोटी रुपये किमतीचे भव्य व्यापारी गाळ्या सह सभागृहाची निर्मिती होणार आहे.

चिमूर नगर पालिका क्षेत्राकरिता पाच कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आमदार बंटी भांगडिया यांचे सर्वत्र आभार माणण्यात येत आहे.