अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त सांडवा -मांडवा शेत शिवाराची शरद मैंद यांनी केली पाहणी.

68

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद -दि. १ सप्टेंबर झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थिती पावसामुळे पुसद तालुक्यातील बोरी खुर्द मंडळा अंतर्गत येत असलेल्या सांडवा -मांडवा शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले.

या पावसामुळे नाल्याकाठील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले, अनेक घरांची पडझड झाली साधन सामग्री वाहून गेली तसेच या शेतशिवारातील नाल्याकाठावरील पावसाच्या प्रवाहात शेतजमिनी खरडून गेल्या. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या शेती उपयुक्त साधने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीत. हातातोंडाशी आलेल्या पिकासोबत सुपिक माती खरडून गेली. तोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिरावल्या गेला. कापूस ,सोयाबीन, तूर इतर पिके नष्ट झाले. खरे पाहता शेतातील सुपीक माती ही शेतकऱ्यांचे सर्वस्व या पिकावर मातीत घाम गाळून शेतकरी मोती पिकवतो. अतिवृष्टीने शेतीची रयाच गेली झालेले नुकसानीची पाहणी करण्याकरिता पुसद अर्बन कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैंद ,दिपक जाधव, धर्मेंद्र जळगावकर, साहेबराव ठेंगे, ॲड बालाजी कपटे, पिंटु फुके, विठ्ठल घुक्से, महादेव डोळस, साहेबराव ढोले, गजानन तामसकर, बळीराम आबळे, हरिभाऊ आबळे, किसन आबाळे, अशोक काष्टे, रमेश ढोले, कैलास आबळे, भगवान आबळे, गणेश आडे, सुदाम आबळे, बाळु आबाळे, पंकज डोळस ईत्यादी मान्यवर मंडळी तथा मांडवा येथील नुकसानग्रस्त शेतकरी मंडळी मोठ्या उपस्थित होते.