माजी खा. अशोकजी नेते यांची गडचिरोलीत खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट

356

 

गडचिरोली:- गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर माजी खासदार अशोक नेते यांच्या गडचिरोलीतील निवासस्थानी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डाँ.नामदेवराव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट व भेटीदरम्यान गप्पा गोष्टी रंगल्या.

यावेळी माजी खा तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांना भेटी दरम्यान हस्तांदोलन करत एकमेकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,सामाजिक नेते राजु कात्रटवार, रमेश चौधरी, रजनीकांत मोटघरे, नद्दीम नाथानी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.