नाशिक प्रतिनिधी -शांताराम दुनबळे
नाशिक -: बौद्धा साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या असताना ज्या बौद्धांनी घरात गणपती बसवला असेल अश्या गद्दारांनी जातीच्या सवलती घेऊ नये. किंवा कोणतेही विधी व सोपस्कार बौद्ध पद्धतीने करू नयेत असे मत पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून कर्मकांड व मनुवादाला तिलांजली दिली आहे. बौद्धांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलती व बौद्ध धम्म जवाबदार आहे. म्हणून आंबेडकर विचाराशी प्रामाणिक राहणे हे कर्तव्य आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गद्दार झालेल्या हरामखोरांनी सरळ सरळ मनुवाद स्वीकारून घंटानाद करत बसावा असा सल्ला डॉ. माकणीकर यांनी बेईमान बौद्धाना दिला आहे.
डॉ. माकणीकर असेही म्हणाले की, सवलती मिळवून नोकऱ्या मिळवल्या शिक्षण घेतलं पोरं पोरींना शिक्षण देत आहात मग बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा न पाळता बौध्द घरात गणपती बसवत असतील तर त्यांनी. खुशाल धम्म, नोकऱ्या सोडव्या व सवलती न घेता आपला संसार थाटावा तसेच घंटा वाजवत मंदिराबाहेर भीक मागत बसावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बेईमान झालेली मनुवादी नाजायज पिलावळ गणपती घरात गणपती बसवते आणि सांगते… बायकोचा अट्टाहास होता, मुलांची जिद्द होती. अरे असल्या बायका सोबत कशाला संसार करता ज्या भारत भाग्य विधाता, बहुजनांचे उद्धारकर्ता तसेच आपल्या बापाच्या बापाला बेईमान होऊन येणारी पुढची सारी पिढी बरबाद करून आंबेडकर वादाला सुरुंग लावतेय. बाल, तरुण आणि युवा भारताला कर्मकांडात धाडतेय. अश्या बायकांना सरळ दया. मंदिरात सेवेकरी म्हणून रुजू करा. नाहीतर बौद्ध संस्काराचे धडे देऊन तिच्याच बदल घडवा.
गणेशोत्सव हा हिंदू बांधवांचा मोठा उत्सव माणला जातो. तो त्यांना हर्ष उल्हासात साजरा करू द्या. त्यांना शुभेच्छा द्या. त्यांच्या उत्साहात सामील व्हा. पण आपल्या घरात तसें वातावरण निर्माण करून जुनाट चाली रीतीनां प्रोत्साहन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बेईमान होऊ नका. आणि असे बौद्ध घरात गणपती बसवत असतील तर त्यांना इतर बौद्धानी विरोध करून त्यांचे परिवर्तन करा. शेवटी आयकत नसतील तर त्यांच्या कोणत्याही विधी व सोपस्काराला ला बौद्ध व नातेवाईकांनी जाऊ नये. असे आवाहन पञकार पॅन्थर माकणीकर यांनी पञकाद्वारे केले आहे.