अनुसूचित जाती-जमातींमध्ये वर्गीकरण करण्याचा निर्णय घातकच-अण्णासाहेब कटारे

58

 

 

 

नाशिक -शांताराम दुनबळे, प्रतिनिधी

नाशिक :- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की, नुकताच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती-जमातीमध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमाती समूहामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आप- आपसात वाद होतील व अनुसूचित जाती जमाती एकत्र असलेले समूह विखुरला जाईल याची भीती आहे.
राज्यांना वर्गीकरणाचे आदेश देण्यात आले असले तरीही गैरवापरच जास्त होण्याची शक्यता आहे.

देशातील प्रस्थापित, सत्ताधारी व विरोधी पक्ष मागासवर्गीय यांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करतात मात्र निर्णयाबाबत ते मूग गिळून बसल्याचे चित्र यात दिसत आहे.
महाराष्ट्रात अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीची जनगणना झालेली नाही मग वर्गीकरण कशाच्या आधारावर होणार हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, सुप्रीम कोर्टाने आदेशात क्रिमिलियरची तरतूद केलेली आहे ही तर भयावह अशीच बाब आहे.

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची विनंती आहे की, सुप्रीम कोर्टाने या निर्णयाचा फेरविचार करावा असे कटारे यांनी बोलतांना शेवटी सांगितले.
—–
*अनंत पांचाळ यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड.*

 

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे सर्व स्तरातील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दररोज असंख्य नेते कार्यकर्ते जेष्ठ नागरिक महिला युवक युवती पक्षात दाखल होत आहे मुंबईमध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे.
मुंबईच्या बऱ्याचशा भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपले जाळे पसरविले आहे मुंबईमध्ये आणखी पक्षाची ताकत भक्कमपणे उभी करण्यासाठी पक्षाने जुने जाणते रिपब्लिकन नेते अनंत पांचाळ यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी अनंत पांचाळ यांच्या निवडी प्रसंगी व्यक्त केला.