शालेय पालन पोषण आहार (खिचडी)च्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-आमदार बंटी भांगडिया

86

 

 

चिमूर -शाळेतील विद्यार्थ्यांना शिजलेले खाऊ मिळत असून कमी मानधनात काम करीत असल्याने त्यांचे कौतुक येते. पोषण आहार निकृष्ट असेल तर ते निकृष्ट स्यांम्पल पाठविले तर त्या कंत्राटदारवर कारवाई करता येईल जेणेकरून चांगला आहार मिळेल. मानधन वाढ व अन्य समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सांगितले.

शालेय पोषण आहार (खिचडी ) संघटना चिमूर तालुकाची नेहरू विद्यालयात झालेल्या मिटिंग मध्ये आमदार बंटीभाऊ भांगडिया बोलत होते.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजु झाडे, घनश्याम असावा, सौ मायाताई नन्नावरे, उज्वला बावणकर, आशा चन्ने उपस्थित होते.

शालेय पोषण आहार ( खिचडी ) जिल्हा संघटक श्रीधर वाढई यांनी पोषण आहार संघटनेचे कार्यकर्ते अल्प मानधन वर काम करीत असून विविध समस्या सांगितले.तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या.