खेलो इंडिया वुमेन्ससाठी निकीता पवारची महाराष्ट्र संघात निवड

49

 

*जळगाव( दि.१०)-( प्रतिनिधी)* – जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनची खेळाडू कु. निकीता दिलीप पवार हिची खेलो इंडिया वुमेन्स लिग फेज-२ आणि दुसरी अस्मिता तायक्वांडो लिग साठी मुलींच्या ज्युनियर ५२ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

या स्पर्धा दिंडीगुल, तामीळनाडु येथे दि. ११ ते १४ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहेत. निकिता पवार हिने नुकत्याच बिड येथे झालेल्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले होते. या कामगिरीवर तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले.