आगामी काळात बांबूच्या माध्यमातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यावर भर – माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी

32

 

धानोरा(गडचिरोली ): येणाऱ्या काळात मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध होणार असून या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास चांगली मदत होणार आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केले. धानोरा तालुक्यातील पाच परिसरातील ग्रामसभा प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

या बैठकीत बांबू लागवटीसाठी शासनाकडून रोजगार हमी योजनेंतर्गत 1 हेक्टरला 7 लाख रुपये अनुदानाची योजना आहे. या योजनेमार्फत बांबू लागवड लागवडीसाठी खड्डे खोदणे, रोप लावणे, रोपांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, कुंपण करणे व इतर कामे या रोजगार हमी योजनेतून करायचे असून, बांबू लागवड केल्यानंतर 4 वर्षांनी बांबूचे उत्पादन मिळते. या माध्यमातून बांबूचे उत्पादन एकरी दीड लाख ते दोन लाख उत्पन्न शेतकऱ्यांना, योजना धारकांना, ग्रामसभांना व व्यक्तीक लाभार्थ्याना मिळणार आहे. तसेच पुढील 40 वर्षे हे उत्पन्न मिळत राहील. यामुळे आधुनिक काळात पर्यावरण संतुलन साधण्यासाठी बांबूवर आधारित पर्यावरण पूरक उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच बांबू टाइल्स, फर्निचर, अगरबत्ती काड्या, टूथपिक व इतर वस्तूंसाठीही बांबूचा उपयोग होईल. यासोबतच दगडी कोळसा ऐवजी बांबूचा वापर करून वीज निर्मिती करण्याचे सुद्धा शासनाचे धोरण आहे. बांबूपासून इथेनाल, कपडे, साबुन, चारकोल अशा प्रकारचे सौंदर्यप्रसाधनेही तयार करुन त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध होणार असून, या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास चांगली मदत होणार आहे, या शब्दात माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी सर्वांना मार्गदर्शन करत संबंधित विषयांवर चर्चा केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामसभेचे प्रतिनिधी सहभागी झालेले होते.

या बैठकीला ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर देवाजी तोफा, तालुका ग्रामसभेचे अध्यक्ष बाजीराव नरोटे, नार पुजारी गणूजी जांगी, मुक्तिपथ उपसंघटक भास्कर कड्यामी, इलाका भूमिया गणेश मडावी, बाजीराव वालको, हरिराम धुर्वे, दानसु तोफा, परसराम कोवाची, ग्रामसभा सचिव देविदास उसेंडी, शालिकराव पदा, पतृराम नैताम, कुंभारशहा कोडाप, उमेश उईके, प्रदीप बोगा, अमित नरोटे, रावणशाह तुलावी, कुणाल कोवे, विनोद धुर्वे, संजय गावडे, सचिन उईके, गणेश मडावी आदी ग्रामसभा अध्यक्ष व सचिव तसेच आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.