रामगिरी महाराज व नितेश राणे विरोधात चिमुरात मुस्लिम समाजाने काढला निषेध मोर्चा

158
Advertisements

 

 

चिमूर 🙁 प्रतिनिधी)-सिन्नर तालुक्यातील शहपंचाळे गावात 177 वा अखंड हरीनाम सप्त्यात महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन सुरु असताना मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने तसेच अहमदनगर या ठिकाणी भाजप आमदार नितेश राणे यांनी धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे व चुन चुन के मारेंगे असे धमकी देणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या विरोधात चिमूर येथे रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या विरोधात मुस्लिम एकता कमेटीच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
मुस्लिम एकता कमिटीच्या युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून भडकावणारे वक्तव्य करणाऱ्या व एका समाजाला टार्गेट करून लोकांच्या भावना भडकावून तेढ निर्माण करणारे भाषण दिल्यामुळे व त्यांनी आपल्या भाषणात मञ्जिदीचा उल्लेख करून मुस्लिम समाजाला घोर अपमान करण्याचा प्रयत्न करून शासनाच्या पाठबळावर बेफाम वक्तव्य करून राज्याची शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा रामगिरी महाराज, नितेश राणे यांचा डाव असल्यामुळे जिभेवर येईल असे भडकवू वक्तव्य करून राज्यामध्ये गोंधळ घालण्याचा व शेकडो युवा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.

कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणाऱ्याला आमदार पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राणे विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा करून निषेध करण्यात आला.

यावेळी राज्य शासन नाम मात्र गुन्हे दाखल करून अशा अलबेल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना मोकाट सोडत असल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांना अटक करा अशा घोषणा देत मुख्यमंत्री यांना नागरिकांनी निवेदन देऊन अशा विधानसभा सभागृहातील सदस्याकडून राज्यामध्ये बेफाम उत्सुक वक्तव्य करून वातावरण चिकळवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आवर घाला व रामगिरी महाराज व नितेश राणे यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मुस्लिम एकता कमेटीचे तंजिल रजा, हाफिज अनिस, हापिज अहमद, हापिज अजहर, मौलाना अन्सार, मोहम्मद सौद, मोहम्मद आरिफ, अजहर पटेल, कलीम पठाण, कलीम शेख,पप्पू भाई, आरिफ बाबू, रिजवान पठाण, अब्दुल राजिक, जमीर शेख, इकबाल सौदागर यांचे सह चिमूर शहरातील व परिसरातील हजारो मुस्लिम बांधव व भगिनी निषेध मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी पोलीस बंदोबस्त ठाणेदार बाकल यांच्यासह यांचा ताफा उपस्थित होता.