चिमुर विधानसभा आरपिआय (आठवले) स्वबळावर लढणार?

406
Advertisements

 

चिमुर:- आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची सर्वच पक्षाणी तयारी सुरू केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा महायुतीतील घटक पक्ष असुनही महायुतीच्या दुटप्पीपणा मुळे कार्यकर्ते नाराज असुन लोकसभा निवडणुकीत ऐन वेळी कार्यकर्तेत्यांनी युतीच्या उमेदवारांची साथ सोडली होती.
आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत रिपाइं (आठवले) गटांचे सक्षम उमेदवार चिमुर विधानसभेत उभा करणार असल्याचे सूतोवाच जिल्हा उपाध्यक्ष केशव रामटेके, नागभिड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खोब्रागडे, चिमुर तालुकाध्यक्ष हेमंत भैसारे यांनी नुकतेच केले आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मच्छिंद्र खोब्रागडे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असुन आगामी चिमुर विधानसभेची उमेदवारी महायुती जरी आरपीआय देणार नसेल तरी आरपिआय आठवले पक्षाव्दारे सक्षम उमेदवार उभा करून हि निवडणूक प्रतिष्ठेची करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने आरपिआय (आठवले) गटांचे कार्यकर्त्यांनी दुय्यम वागणुक दिली. तर चिमुर विधानसभेची नागभिड, चिमुर या तालुक्यातील कोणत्याही कार्यकर्त्यांना तालुका स्तरावरील समितीमधे स्थान दिले नाही. नेहमीच महायुती कडुन दुय्यम स्थान मिळतं असल्याने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावरच आरपिआय (आठवले) चिमुर विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार उभा करुन निवडणुक लढवणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष केशव रामटेके, नागभिड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खोब्रागडे, चिमुर तालुकाध्यक्ष हेमंत भैसारे यांनी सुतोवाच केले आहे.