गंगाखेड विधानसभेत विजयाची तुतारी वाजणार – माजी आमदार सिताराम घनदाट मामा

550

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

 

गंगाखेड :-खासदार शरद पवार साहेबांची भेट घेत गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांनी आपला कार्य अहवाल सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना मजबूत करण्याचे अविरत काम करत आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत शरद पवार साहेबांचे विचार पोहचवण्याचे काम आम्ही अविरतपणे करत राहू. असे या भेटीत साहेबांना शब्द देत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.

हि भेट मा.आ.श्री.सिताराम घनदाट यांना येणाऱ्या निवडणुकीत आपले संघटन अन् विजयी होण्यासाठीची मार्गदर्शन बैठक असल्याची चर्चा विधानसभेत आहे.
मा.आ.श्री.सिताराम घनदाट मामा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटिनंतर श्री.शरदचंद्र पवार साहेबाच्या सोबत राहणे पसंत करत आपला मार्ग निवडला होता ,ते आज पर्यंत श्री शरदचंद्र पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहण्यास कटिबध्द असल्याच सांगत गंगाखेड विधानसभेत विजयाची तुतारी वाजणार असा त्यांनी पवारांना शब्द दिला अन् गंगाखेड विधानसभेतून मोठ्या मताधिक्याने विजयी होवून पक्षाचे मताधिक्य वाढविणार , या वेळी विधानसभेतील पदाधिकारी श्री.ब्रह्मानंद भोसले सोबत होते.