जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयापुढे खेळाडूंचे साखळी व आमरण उपोषण पाच टक्के आरक्षण अंतर्गत खेळाचे प्रमाणपत्र पडताळणी करुन श्रेणी निश्चित करा

60

 

रोशन मदनकर, उपसंपादक ,
मो. 8888628986
भंडारा :- आजचा खेळाडूंचा उपोषणाचा सहावा दिवस शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरी साठी खेळाडूंना ५ टक्के आरक्षण अंतर्गत खेळाचे प्रमाणपत्र पडताळणी करुन श्रेणी निश्चित करुन मिळणेबाबत सर्व खेळाडूंनी दि. ०४/०१/२०२४ रोजी कॅनोईंग अॅण्ड कयाकिंग तसेच इंगनबोट क्रीडा स्पर्धेचे ऑलइंडिया युनिर्वसीटी स्तरावरील प्राविण्य प्राप्त प्रमाणपत्राची पडताळणी करन मिळणेबाबत विनंती केली होती. कार्यालयाकडून सदर पडताळणी ४५ दिवसांच्या आत करुन मिळणे अपेक्षित होते. परंतू कार्यालयाकडून खेळाडूना अद्यापर्यंत काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग नागपूर यांना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी खेळाडूंना ५ टक्के आरक्षण अंतर्गत खेळाचे प्रमाणपत्र पडताळणी करुन श्रेणी निश्चित करुन मिळणेबाबतचा पत्रव्यवहार केला होता. प्रमाणपत्राची पडताळणी करणे करीता जवळपास ६ ते ७ महिन्यांमध्ये वारंवार त्यांच्या कार्यलयास प्रत्यक्ष जावून विचारणा केली असता त्यांच्या कार्यालयाने खेळाडूना नेहमी उडवाउडवीची उत्तरे देवून दिशाभुल केली व अद्यापपर्यंत प्रमाणपत्रांची पडताळणी करुन श्रेणी निश्चित केली नाही, त्यामुळे खेळाडूंना विनाकारण आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
खेळाडूंच्या प्रमाणपत्राची पडताळणी न झाल्यामुळे मागील ६ ते ७ महिन्यात झालेल्या बऱ्याच शाकीय नोकर भरतीमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये दुःखाची व निराशेची भावना खेळाडूंमधे निर्मान झाली. हा मोठा अन्याय झाला असल्यामुळे खेळाडू दि. ०९/०९/२०२४ पासून प्रशासन व शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयापुढे साखळी व आमरण उपोषणावर बसले आहेत. खेळाडूंची बाब लक्ष्यात घेऊन संबधीत प्रशासनाने व शासनाने लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी.
उपोषणाला बसलेले खेळाडू सौरभ भोदे , दिशाल सोनबावणे, दर्शन बेंदेवार ,अमिर निंबार्ते , करण वाघाये, करण शेंडे, तुषार निंबार्ते, गौरव निंबार्ते, ललित वैद्य, श्रिवंत शेंडे , चैतन्य खोब्रागड, भुषण बोरकर,आचल भुरे , मुस्कान उके ,वैष्णवी आजबले, श्रद्धा साठवणे,रुपाली टांगले , पूजा बुराडे.