बेपत्ता तरुणाचा मृतदेह दरीत सापडला

312
Advertisements

 

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

 

गंगाखेड :- गंगाखेड तालुक्यातील वाळके पोखर्णी येथील 30 वर्षीय तरुण विठ्ठल भगवान परकड हा तरुण दिनांक 6 सप्टेंबर 2024 पासून बेपत्ता होता. या बाबत 8 सप्टेंबर 2024 रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात अली होती, दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सुरळवाडी परिसरात कालव्याच्या दरीत मृतदेह असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांना मिळाली असता पोलिस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे पोह. संभाजी शिंदे यांनी घटनास्थानी धाव घेवून अग्निशामक दलाला पाचारण करुन शेख रशीद यांच्या हायड्राला लोंखडी बाज बांधून यावर शेख शकील व अमजद खान पठाण यांना कालव्याच्या दरीत सोडून मृतदेह बाहेर कडण्यात आला तसेच महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी मारोती सदाशिव परकड यांच्या सांगण्यावरून अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे करत आहेत.