शासकीय इतमामात सी,आर,पी,एफ जवान संभाजी आमटे यांच्यावर अंत्यसंस्कार

363

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक १५ सप्टेंबर) आदर्श गाव पिंपळदरी येथील १४० बटालियन चे सी.आर.पी.एफ. जवान संभाजी आमटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुसद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान
शनिवार १४ सप्टेंबर रोजी १२ वाजताच्या दरम्यात दुःखद निधन झाले, सैन्यातील जवानाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.
संभाजी आमटे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.

१२वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच १९९६ मध्ये सी.आर.पी.एफ,बटालियन मध्ये रुजू झाले होते,जम्मू काश्मीर, आसाम, मिझोराम,बिहार,अशा देशातील अनेक राज्यात त्यांनी २८वर्ष आपली सेवा बजावली होती. तर आता ते मणिपूर येथे आपले कर्तव्य बाजाबत होते,कामा निमित्ताने गावाकडे येत असताना प्रवासात त्यांच्या छातीमध्ये दुःखत होते म्हणून त्यांनी पुसद येथे बसमधून उतरून थेट रुग्णालय गाठले आणि रुग्णालयात भरती झाले,पण उपचारादरम्यान त्यांना मोठा हृदयविकार झटका आल्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला रविवारी दुपारी १ वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळदरी येथे आणण्यात आले.

सी.आर.पी.एफ
बटालियनच्या जवानांकडून त्यांना मानवंदना देऊन शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले,
त्यांच्या अंत्यविधीसाठी उमरखेड मतदार संघाचे माजी आमदार विजयराव खडसे,जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती तातूभाऊ देशमुख,विश्वपाल धूळधुळे,बाजार समितीचे उपसभापती मंचकराव चव्हाण,बाळासाहेब देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणात राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने गावातील,परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

तर प्रशासना मार्फत पोफाळी पोलीस स्टेशनचे पी,एस,आय, आशिष झिमटे, सी,आर,पी,एफ, जवानांची तुकडी उपस्थित होती.

या सर्वांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी त्यांना शेवटचा निरोप दिला.