मानवतेचे प्रणेते प्रेषित मुहम्मद स.स.

298
Advertisements

 

 

 

 

प्रेषिततां बद्द्ल पवित्र कुरआन येते की ,….
(हे प्रेषित मुहम्मद ) आम्ही तुम्हाला संपूर्ण विश्वांकरिता दयाळू बनवून पाठविले आहे.
         ~( कुरआन: 21;07)

ईथे प्रेषितांचे आदर्श स्पष्ट करण्यात आले आहे. की प्रेषित मुहम्मद स.स हे फक्त मुस्लीम समाजाचेच मार्गदर्शक नसून अखिल मानवजातीचे आदर्श आहे . म्हणुन प्रेषितांना फक्त एका समाजासाठी मर्यादित करणे हे खूप मोठे अन्याय आहे. जगातील कोणताही महापुरुष फक्त एका समाजाचा नसुन सर्व लोकांनी त्यांचे आदर्श घेतले पाहिजे.

प्रेषित मुहम्मद स.स यांची लहानपणा पासूनच जडण घडण ही नैतिक्तच्या मूल्यांवर होत होती.
प्रेषित मोहम्मद स.स यांनी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी मानवतावादी भूमिका घेतली त्यांचें अवघे आयुष्य हे मनुष्याच्या चरित्र निर्मितीसाठी आणि मानवतेचे शिकवणीसाठी व्यापले होते. प्रेषित मुहम्मद स.स  लहानपणापा सूनच खूपच सत्यवादी , न्यायवादी, परोपकारी, समतावादी वृत्तीचे होते. प्रेषितांच्या सोबत असणारे इतर धार्मिक लोक सुद्धा प्रेषितांच्या या गुण वैशिष्ट्यांमुळे प्रभावित होते आणि त्यांना माहिती होते की आपल्या सर्वांपैकी नैतिक मूल्यांमध्ये आणि चरित्रामध्ये  प्रेषित मुहम्मद स.स सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच यहुदी लोक हे आपल्या मौल्यवान वस्तूंना संरक्षणासाठी प्रेषित स.स यांच्या जवळ आणून ठेवतकारण त्यांना या गोष्टीचे निश्चितता होती की प्रेषित स.स हे कधीही धोका देत नाही तसेच खोटं देखील  कधी बोलत नाही त्यामुळे तेथे जर काही तंटा आणि वाद निर्माण झाला तर ते सर्वप्रथम प्रेषित स .स यांच्या मध्यस्थीमध्ये मिटविला जाई म्हणजेच प्रेषितांचे अवघे आयुष्य हे पर परोपकारी आणि सत्यवादी होत. प्रेषितांनी कधीच आपल्या आयुष्यामध्ये राग, लोभ, द्वेष अन्याय, अत्याचार यांना थरा दिली नाही उलट  प्रेषितांवर जर कोणी वाईट बोलले असेल त्यांची निंदा केली त्यांच्यावर अत्याचार केले असेल तरीसुद्धा प्रेषितांनी त्यांना कधीच रागाने किंवा त्यांच्याविरुद्ध कार्य करत नसत  प्रेषित मुहंमद स.स मनुष्याच्या हे वाईट वृत्तीचे तिरस्कार करीत मनुष्याचा नव्हे.

प्रेषित मुहम्मद स.स म्हंतात सर्व मानव जात आदमची संतान आहे. संपूर्ण मानव हे एका आई वडिलांची संतान आहे त्याच्यामुळे कोणत्याही मनुष्यचा तिरस्कार नाही करावा. कोणताही व्यक्ती वाईट कर्म करतो तो स्वतः करत नसून सैतानी प्रवृत्ती त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते त्याच्यामुळे व्यक्तीचा द्वेष नाही केला पाहिजे तर त्याच्या विचारांची सुधारणा केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका प्रेषित स.स. यांची होती.
प्रेषित मुहम्मद स.स यांनी या जगाला नैतिकतेचे मूल्य, मानवतावादी शिकवण दिली. प्रेषित मोहम्मद स.स यांच्या जन्मा वेळची परिस्थिती आपण वाचली पाहिजे तर आपल्याला कळणार की प्रेषित मोहम्मद (सलल्लाहू आले व सलम) हे ज्या काळामध्ये या जगात आले तो काळ अत्यंत अंधकारमय नैतिक, क्रुरतेच्या शिखरावर पोहोचला होता .कोणत्याच प्रकारची माणुसकी, शीलता नैतिकता, उरली नव्हती मनुष्य हा मनुष्य नसून त्याने दानवाचे रूप धारण केला होते.

कारण की त्या काळामध्ये जे धर्मभ्रष्ट  झाले होते.  लोकं आपल्या मर्जीने जे स्वतःला वाटेल ते करीत होतें. तथाकथित जे लोकं स्वतःला श्रेष्ठ समजत होते त्यांनी त्यानुसार धर्म चालवायला लागले होते.ज्यामध्ये कोणत्याच प्रकारचे नैतिक मूल्य मानवतावादी शिकवण नव्हती . त्यावेळची क्रूरता या द्वारे समजण्यास सोपी होईल की, पाणवठ्यावर जर  कोणत्याही व्यक्तीचा घोडा हा दुसऱ्या व्यक्तीच्या घोड्याच्या पहिले पाणी पीत असेल तर या छोट्याशा गोष्टीमुळे कित्येक वर्ष युद्ध चालत होते आणि या युद्धामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होत होते. कोणत्याच प्रकारची सुरक्षा नव्हती खुलेआम चोरी, व्यभिचार होत होते स्त्रियांना कोणत्याच प्रकारचे स्थान होते वृद्धांना कोणत्याच प्रकारची  मानसन्मान नव्हता. गुलामांना प्राण्याप्रमाणे वागविले जात होते अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्रेषित मोहम्मद स.स यांचा जन्म होतो, विचार करा किती मोठे आव्हान होते, जर मुलीचा जन्माला आली तर त्या मुलीला जिवंत गाडण्यात येत होते. कारण की मुली जन्माला येणे  खूप वाईट समजण्यात येत होते, या अशा परिस्थितीत प्रेषित मोहम्मद स .स यांनी सुधारणेचे कार्य केले. त्यांनी संपूर्ण परिस्थिती बघितली आणि त्यांना खूप चिंता वाटत असे  कारण  मनुष्य समाज हा अत्यंत वाईट मार्गावर जात होता .यासाठी प्रेषित मुहम्मद स.स नेहमी चिंतन करत असत अल्लाहशी नेहमी प्रार्थना करीत होते.

या अशा समाजाला एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत होते त्यांच्या या प्रयत्ना परीक्षित मोहम्मद अस्लम यांना जेव्हा प्रेशि तत्व मिळतो तेव्हा ते कोणत्याही प्रकारचा आराम न करता या आपल्या कार्याला समर्पित होतात आणि असा नैतिक मानवतावादी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतले आणि पवित्र कुरांद्वारे त्यांच्यावर ज्या जी आकाशवाणी होत होती त्याद्वारे ते मक्केत समाजाला मार्गदर्शन करीत होते.

त्यांच्या या मार्गदर्शनाला जे सत्यवादी लोक होते, त्यांनी अंगीकारले परंतु जे स्वतःला वर्णाने श्रेष्ठ समजत होते आणि अन्याय अत्याचार सत्य लपवून ठेवण्याची त्यांना सवय होती. अशा लोकांनी प्रेषितांनी दिलेली शिकवण अमान्य केली. परंतु प्रेषित म्हणून असलं नेहमी आपलं कार्य सातत्याने सुरू ठेवीत होते त्यांनी समाजाला किंवा अखिल मानव जातीला जी शिकवण दिली ती अशाप्रकारे होती की हे बा हे मनुष्य समाजांना तुमचा पालन करता हा एकच आहे आणि तुमचे आई-वडील सुद्धा एकच आहे. त्याच्यामुळे तुमच्या मध्ये कोणत्याच प्रकारचा जातिवाद, वर्णवाद, द्वेष, उच्चनीचता नसायला पाहिजे. तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्यक्ती तो आहे जो थकवा धारण करतो. थकवा म्हणजे ईश्वर त्याच्या व्यतिरिक्त कोणीही त्याच्या व्यतिरिक्त कोणीही रंगाने पैशाने विभागाने उच्च नसेल तसेच प्रेषित माणूस अस्लम यांनी सांगितले की, या जगामध्ये जर ईश्वर बाळगून आपलं जीवन व्यतीत केलं तर तो एकमेव अल्लाह (निर्माता) ज्याने आपल्याला निर्माण केले तो या जगामध्ये आणि यानंतरच्या मृत्यू नंतरच्या पारलौकिक जगामध्ये सुद्धा यशस्वी करणार परंतु जे लोक इथं लोकांना वर अत्याचार अन्याय करणार आणि ज्या निर्माण करताना त्यांना निर्माण केलं त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणाला त्याचे स्थान देणार अशा लोकांना शेवटी नरकामध्ये स्थान मिळणार तसेच या जगामध्ये सर्व लोकांसमोर सोबत चांगल्या भावनेने वागले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला त्रास नाही दिला पाहिजे, मुली चा जन्म हा सर्वांसाठी आनंदाचा ठरला पाहिजे, मुलीचा जन्मामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि तिचे साधन अल्ला त्या घराला प्रधान करतो त्याच्यामुळे मुलीला नेहमी प्रेमाने वागणे वागविले पाहिजे. आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे आणि वडील हे स्वर्गाचे दार आहे. त्याच्यामुळे आई-वडिलांशी जर वाईट वर्तणूक केली तर अल्ला अशा व्यक्तीला कधीच माफ करणार नाही तसेच जे लोक अनाथ आहे, ज्यांना दुसऱ्याच्या सहकार्याची आवश्यकता आहे. अशा लोकांना नेहमी सहकार्य केले पाहिजे. तसेच महिलांशी सन्मानपूर्वक वागले पाहिजे. आपल्या शेजाऱ्यांसोबत प्रेमाने वागले पाहिजे. एका ठिकाणी प्रेषित माणूस असून म्हणतात की, जर कोणत्या व्यक्तीचा शेजारी उपाशीपोटी असेल आणि त्या व्यक्तीने स्वतः पोट भरून जेवण केले असेल तर तो व्यक्ती आमच्यापैकी म्हणजे मुस्लिम नाही म्हणजे प्रेषित स.स यांनी कर्मकांडावर जास्त भर न देता वास्तविक समाजामध्ये समाजोपयोगी कार्य समाजामध्ये न्यायपूर्वक वागणे यावर जास्त भर देऊन आदर्श समाजाची निर्मिती केली.

दारू ही सर्व वाईट व्यसनांची जननी आहे, त्याच्यामुळे दारू हे हराम म्हणजे निषेध आहे तसेच पवित्र पोरांमध्ये येते की व्याधीचाराच्या जवळ भटकूही नका म्हणजे जवळ देखील त्याच्या जाऊ नका तसेच जेव्हा कधी स्त्रियांना तुम्ही बघता तर आपले डोळे खाली ठेवा आपल्या नजरा खाली ठेवा म्हणजे तुमचे वाईट नजर पर स्त्रीवर गेली नाही पाहिजे. अशा प्रकारचे नैतिकतेची शिकवण प्रेषित मोहम्मद असलम शांती असो त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर यांनी जगाला दिली जी आज आपल्या समाजाला अत्यंत आवश्यक आहे. आज आपल्या समाजामध्ये आपण बघतो की, कित्येक सारे वृद्धाश्रम निर्माण झाले, अनाथांवर किती अत्याचार केले जाते आणि स्त्रियांवर मुलींवर दर पंधरा सेकंदाला बलात्कार होतो हे किती मोठी लाजिरवाणी बाब आहे, हे यामुळे झाले कारण की मानव हा मानवी मूल्य विसरून गेला आणि तो ईश्वर म्हणजे परमेश्वराची भीती त्यामधून निघून गेली. त्यामुळे तो वाटेल तो कार्य करतो, म्हणून आज प्रेसिद्ध असलं यांच्या आदर्शाची संपूर्ण समाजाला आवश्यकता आहे जर प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गावर मनुष्य समाज चालला तर नक्कीच या समाजामध्ये आदर्श निर्माण होईल आणि समाज आणि देश हा प्रगतीपथावरील प्रगती आणि आपण सर्व नैतिकतेच्या उच्च मूल्यांवर पोहोचू म्हणूनच ईद मिलादुन्नबी म्हणजे पैगंबर जयंती पर्वा निमित्याने आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे की, प्रेषितांनी सांगितलेला मार्ग आपण वाचायला पाहिजे आणि त्याच्यावर अमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण की प्रेषितांचे जीवन हे फक्त मुस्लिम समाजासाठी किंवा अरब लोकांसाठी नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आहे. त्यांनी सांगितलेला मार्ग सर्व लोक अंगीकारू शकतात आणि त्यांच्यावर अंमलबजावणी सुद्धा करू शकतात. त्यामुळे सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी प्रेषित चरित्र वाचले पाहिजे आणि प्रेषित किंवा महापुरुष यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांच्या विचारांना डोक्याच्या आत शिरविले पाहिजे, म्हणजे यांचे विचार आपल्या जीवनामध्ये अंगीकारले पाहिजे कारण एका दिवसासाठी जयंती साजरी करून चालणारी नाही तर जो पर्यन्त प्रेषित मुहम्मद स.स यांनी दिलेली शिकवण आपल्या आयुष्यात आपण अंगीकारत तो पर्यन्त काही उपयोग होणार नाही म्हणूनच प्रेषितांचे विचार खऱ्या अर्थाने विचार लोकांसमोर जेव्हा येईल तेव्हा व्यक्ति, समाज आणि देश नैतिक,आध्यात्मिक प्रगती करेल हीच आशा आहे.

सैय्यद सलमान, पुसद जि. यवतमाळ
मो. 91589 49409