भारतीय संविधानाबाबत संभ्रम पसरविणाऱ्या विरोधकांपासून सावध रहा-आमदार बंटी भांगडिया यांचे उपस्थितीत पळसगाव येथे संविधान भवनाचे लोकार्पण सोहळ्यात आवाहन

43

 

चिमूर – आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या उपस्थितीत पळसगाव येथे खनीज निधी व २५१५ निधी अंतर्गत ८० लक्ष रू .सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन व आमदार निधीतुन बांधण्यात आलेले संविधान भवन (निधी २० लक्ष रू ) लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाले.

शेतकऱ्यांच्या कल्याणा साठी भाजप कल्याणकारी निर्णय घेत असून मात्र विरोधकांच्या खोट्या प्रचारा पासून नागरिकांनी सावध राहण्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी गणेश उत्सव, नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. विरोधक भारतीय संविधाना बाबत संभ्रम निर्माण करीत आहेत, त्यांचेपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, माजी सभापती प्रकाश वाकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी ओमप्रकाश गनोरकर, भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ ममता डुकरे, तालुका अध्यक्ष सौ मायाताई नन्नावरे, माजी प.स. सदस्य सौ. वर्षा लोणाकर, सरपंच सौ सविता गुरनुले, उपसरपंच तुळशीदास शेरकुरे, प्रवीण गनोरकर, सरपंच गजानन गुळधे, प्रशांत अंदनसरे,भूषण डाहूले, हेमराज दांडेकर, प्रभाकर गजभिये, गुमदेव पाटील बोरकर, वामन बांगडे, बूथ अध्यक्ष जानिक बनसोड, शक्तीकेंद्र प्रमुख विनायक ठाकरे, बूथ सचिव संजय गावतुरे, तसेच समीर राचलवार,संजय नवघडे एकनाथ थुटे, संजय खाटीक, अजहर शेख, सुधीर पोहनकर, बंटी वनकर, सचिन डाहूले लला असावा, अमित जुमडे, गोलू मालोदे, मंगेश भुसारी, अभिषेक जाजू, हर्षल डुकरे, आशा मेश्राम आदी उपस्थित होते.