चिमुरातील जिजाऊ नागरी पतसंस्थेला ऑडीट अ वर्ग दर्जा

124

 

चिमुर/प्रतिनिधी ः-

जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिमुर र. नं. 814 ता. चिमुर, जि. चंद्रपुर या संस्थेची सन 2017-18 मध्ये स्थापना करण्यात आली. अवघ्या सहा वर्षाच्या कालावधीत संस्थेला अ वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे.

सदर संस्था आयएसओ 9001:2015 आयएनक्यु/एन-19689/124909/ 0824 यानुसार प्रोव्हायडींग अ‍ॅन्ड फिक्स सेविंग मनी, गुड गव्हनर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंट याकरीता प्रमाणपत्र प्राप्त आहे. अवघ्या सहा वर्षात संस्थेने 8 करोडच्या जवळपास व्यवहार केलेला असुन संस्थेने पुढील कालावधीत 100 करोडचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संस्था स्वनिधीत वाढ करणार असुन कर्मचाèयांना पीएफ, सेवाशर्ती देणार असुन वसुली अधिकारी आमसभेत नेमण्यात आलेले आहेत. संस्थेची 1.50 करोडची गुंतवणुक इतर बँकेत आहे. संस्था हि महाराष्ट्र फेडरेशन जिल्हा सहकारी बँक चंद्रपुरचे सभासदात्व प्राप्त केलेली आहे. संस्थेत प्रशिक्षित कर्मचारी असुन संस्थेत संगणकीय व्यवस्थेच्या माध्यमातुन साफ्टवेअरनुसार व्यवहार होत आहेत. संस्थेत एसएमएसची सुविधा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. संस्थेने राखीव निधीची तरतुद केली असुन संस्थेची स्वतःची तिन मजली सुसज्ज इमारत उभी आहे. अवघ्या सहा वर्षात संस्थेने जो उच्चांक गाठला तो आमसभेत सर्व समक्ष वाचन करण्यात आला. संस्थे मार्फत अनेक शासकीय व निमशासकीय योजना घेणार असुन संस्थेच्या वाढ व विकासात अध्यक्षासह इतर पदाधिकारी प्रयत्न करणार आहेत.

संस्थेच्या विकासासाठी अध्यक्ष सुभाष शेषकर, सचिव रामभाऊ खडसींगे, उपाध्यक्ष डॉ. गजानन बन्सोड, लोन समिती अध्यक्ष डॉ. संजय पिठाडे, व्यवस्थापक मिलींद जांभुळे, सहाय्यक व्यवस्थापक शुभम भुडे, रुपाली राणे तसेच कर्मचारी लक्ष्मी चौधरी, कोकीळा दुधनकर, स्वप्नील मसराम, लीना कोरामे, डॉ. चंद्रभान खंगार, डॉ. राजु कसारे, मनीष नंदेश्वर, गजानन कारमोरे, अफरोज पठाण, सुमीत भिडेकर, केशवराव वरखडे, रंगनाथ बांगडे, डॉ. पोर्णिमा खानेकर, नर्मदा भोयर, मंगलाताई वेदी, सपना गंपावार, संस्थेचे कर्मचारी तसेच वसुली एजंट आदीने अथक परिश्रम घेतले.