बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद – मिलादुन्नबी निमित्याने मुस्लिम बांधव प्रेषित मुहम्मद स.स जयंतीचा आनंदोत्सव साजरा करतात .परंतु प्रेषित मुहम्मद स.स हे सर्व लोकांना समजले पाहिजे. कारण प्रेषित मुहम्मद हे फक्त मुस्लिम समाजासाठी नव्हे तर सम्पूर्ण मनुष्यजातीसाठी आले होते .
त्यामुळे त्याचे जिवन चरित्र सर्वच समाजाच्या बांधवांना कळाले पाहिजे जेणेकरून गैर समझ दूर होईल व वास्तविक प्रेषित मुहम्मद स.स यांचे पवित्र जिवन लोकांना समजेल या सैय्यद सलमान सरांच्या संकल्पनेने जमाते इस्लामी हिंद पुसदच्या वतिने पुसद शहरातील पोलीस प्रशासनाची भेट घेऊन त्यांना मराठी भाषेत प्रेषित मुहम्मद साहेबांचे चरित्र भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सर्व प्राथम पुसद शहरातील विश्राम गृहात वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती संक्षिप्त मध्ये प्रेषित चरित्र सैय्यद सलमान सरांनी ठेवले हा उपक्रम सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना खूप आवडला त्यानंतर त्यांच्या परवानगीने वेग वगळल्या चौकातील पोलीस बंदोबस्त मध्ये जाऊन वेग वेगळ्या चौकात तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा वेळ घेऊन त्यांना प्रेषित मुहम्मद स.स यांच्या पवित्र जीवना बद्दल थोडक्यात माहिती सलमान सरांनी मराठी भाषेत दिली.
हा आगळा वेगळा वैचारिक जयंती साजरा करण्याचा उपक्रम सर्वच अधिकार्यांना आवडला यावर त्यांनी सकारत्मक प्रतिक्रिया दिल्या तसेच अशा प्रकारच्या वैचारिक उपक्रमाची आजच्या समाजाला खूप आवश्यकता आहे.अशी भावना व्यक्त केली तर काही अधिकार्यांनी असे सांगितले की,” प्रेषित मुहम्मद स.स हे कोण होते? आम्हाला आज पर्यन्त माहिती नव्हते” परंतु तुमच्या या उपक्रमांमुळे आज आम्हाला कळाले .अश्या प्रकारचा समाज उपयोगी उपक्रम जमाते इस्लामी हिंद, पुसद तर्फे राबविण्यात आला.
या उपक्रमाच्या शिष्टमण्डळात सैय्यद सलमान सोबत नूरूल्लाह खान, रियाज रिजवी, गफ्फार अतिष, तज्जमुल हक, बिलाल खान, सज्जाद भाई, मोहसीन भाई उपस्थित होते. यामध्ये सर्व पोलीस अधिकार्यांना मराठीत प्रेषित मोहम्मद स.स यांचे चरित्र भेट देण्यात आले. अश्या प्रकारे वैचारिक प्रेषित परिचय कार्यक्रम राबविण्यात आला आहे. विशेष म्हणजे दर वर्षी मिलादुन्नबी निमित्ताने अशी वेग वेळ उपक्रमे राबविली जातात.