बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद-येथील चार्वाकवनात संपन्न झालेल्या भाद्रपद पौर्णिमा धम्मसंगितीत, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, सेवा निव्रुत शिक्षक आयु. यशवंतराव देशमुख यांचा देहदान केल्याप्रित्यर्थ चार्वाकवन प्रशासनाने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे.
चार्वाकवनातर्फे सातत्याने देहदानाचे आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद म्हणून धम्मसंगितीचे सदस्य यशवंतराव देशमुख यांनी मरणोत्तर देहदान केले असून देहदान केल्याचा दस्तऐवज (इच्छा पत्र) वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ कडे सादर केला आहे.
यापूर्वी चार्वाकवनाचे व्यवस्थापक अड. अप्पाराव मैन्द, तसेच धम्मसंगितीचे सदस्य संजय असोले, रमाकांत आणि विजया मामीडवार यांनी देहदान केले आहेत.
धम्मसंगितीत चर्चा सुरु होण्यापूर्वी संगितीत प्रथमतःच सहभागी झालेल्या पुंडलीक नागोराव भालेराव याचे पुष्प देऊन संगितीचे अध्यक्ष मनोहरराव भगत यांनी स्वागत केले आणि त्यानंतर प्रल्हाद खडसे यांनी बौद्ध धम्मातील भाद्रपद पौर्णिमाचे महत्व विशद केले.
सद्धम्मावरील झालेल्या चर्चेत सर्व पी. बी. भगत, रमाकांत मामीडवार, यशवंतराव देशमुख, दत्तानंद गोस्वामी, जी.एम.कांबळे, एम. एल. धुळध्वज, अड.अप्पाराव मैन्द यांनी भाग घेतला.
धम्मसंगितीचे अध्यक्ष मनोहरराव भगत यांनी चर्चेचा समारोप केला आणि संजय असोले यांनी उपस्थिताचे आभार मानले.
यावेळी चंद्रकांत आठवले, विश्वनाथ जोहरे, रमेश सरागे, नारायणराव जाधव, भोजन्ना अटिपल्लेवार, जयसिंग राठोड, प्रल्हाद सूर्यवंशी, शुभम थोरात इत्यादी उपस्थित होते.