सरपंच आणि महिलांना अवैध दारू विक्रेत्याची अश्लील व जातीवाचक शिवीगाळ

243
Advertisements

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

पुसद तालुक्यातील आदिवासी बहुल असलेले हर्षी येथे अवैध दारू आणि जुगार मटका यांच्या विरोधात सरपंच आणि गावातील शेकडो आदिवासी महिलांनी दि. १५ सप्टेंबर रोजी एल्गार पुकारला होता.

यामध्ये गावातीलच पाच ते सहा जण अवैध दारू विक्री करणारे याच्या घरी जाऊन अवैध दारू विक्रीचा भांडाफोड केला. त्यापैकी एक अवैध दारू विक्री करणारा आरोपी शिवाजी गोविंदराव मस्के वय ५८ वर्षे यांनी आपली अवैध दारू विक्रीचा भांडाफोड होत असल्याचे पाहून गावातील सरपंच गजानन टारफे आणि गावातील शेकडो आदिवासी महिलांना उद्देशून अश्लील शिवीगाळ तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अवैध दारू विक्री, अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हर्षी गावचे सरपंच गजानन टारफे यांनी पोफाळी पोलीस स्टेशन येथे आरोपी शिवाजी मस्के यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोफाळी पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी शिवाजी मस्के याला ताब्यात घेतले. आणि आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमं २९६,३५१(२),३५१(३) सहकलमं ३(आई)(आर),३(आई)(एस) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळी पोलीस करीत आहेत.