ने.हि.उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी नेहरू हॉकी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

226

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

 

ब्रम्हपुरी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर द्वारे आयोजित नेहरू हॉकी स्पर्धेत 15 वर्षे वयोगटाखालील गटात ने.हि. उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी च्या संघाने सेंट मेरी हायस्कूल, चंद्रपूरच्या संघावर 8-0 अशा मोठ्या फरकाने दणदणीत विजय प्राप्त करीत विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला. विद्यालयाचा व तालुक्याचा नाव जिल्ह्यात उंचावणाऱ्या ने.हि.हॉकी संघातील सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच क्रीडा मार्गदर्शक तथा पर्यवेक्षक ए. डब्लू.नाकाडे व संघ व्यवस्थापक गिरीधर सिंधीमेश्राम यांचे संस्थेचे सचिव अशोक भैया तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य के.एम.नाईक यांचेसह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.