विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांकडून समाज क्रांतीकारक नेते पेरियार रामास्वामी नायकर आणि प्रबोधनकार केशव ठाकरे यांची जयंती साजरी.

28

 

चंद्रपूर (प्रतिनिधी) सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटचे जनक आणि आपल्या समतावादी तसेच विज्ञानवादी विचारांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्माच्या नावाखाली शोषण करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध जोरदार लढा देणारे पेरियार ई. व्ही. रामास्वामी नायकर आणि बहुजन समाजाला जागृत करून त्यांना विवेकवादी मार्ग दाखविणारे थोर सत्यशोधक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे या दोन्ही महापुरुषांची जयंती 17 सप्टेंबर रोजी सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटच्या जटपूरा गेट चंद्रपूर येथील कार्यालयात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे होते. या जयंती समारंभात बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे, सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव किशोर पोतनवार, कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश पिंजरकर, कम्युनिस्ट पक्षाचे नेते अरूण भेलके, महाराष्ट्र अंधश्रद्धा समीतीचे चंद्रपूर जिल्हा संघटक पी.एम.जाधव, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव नवनाथ देरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर न्याशनल असोसिएशन आफ इंजिनियर्सचे चंद्रपूर जिल्हा सचिव इंजिनिअर किशोर सवाने, सत्यशोधक समाजाचे जिल्हा संघटक इंजिनिअर सुर्यभान झाडे, इंडिपेंडंट लेबर युनियनचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर अशोक मस्के, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर प्रदीप अडकीने, सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटचे इंजिनिअर एल.व्ही.घागी, निळकंठ पावडे, प्रा.भाऊराव मानकर तसेच महीला प्रतिनिधी पोर्णिमा बलवीर इत्यादी मान्यवरांनी पेरियार रामस्वामी नायकर तसेच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मुल्य टिकवून ठेवण्यासाठी बहुजन समाजाला जागृत करून या दोन्ही महापुरुषांचे विचार संवर्धन करण्यासाठी सर्व समविचारी संघटनांनी एकत्रित येऊन काम करण्याचा निर्धार सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे भास्कर मून, संचालन राहुल गायकांबळे यांनी तर आभार रविंद्र चिलबुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटचे संघटक भास्कर सपाट, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे दिपक जुमडे, रामेश्वर चिकाटे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.