चिमूर अप्पर जिल्हाधिकारी मधून ब्रम्हपुरीला वगळून स्वतंत्र जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्रीकडे मागणी

246

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

 

ब्रम्हपुरी :- तालुका जिल्हा व्हावा यासाठी ब्रम्हपुरीकर नेहमीच आपल्या माती पासून ते मंत्रालयापर्यंत संघर्ष करीत आहेत.
ब्रम्हपुरी जिल्हा करावा व ब्रम्हपुरी ला चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कक्षेतून वगळून स्वतंत्र ब्रम्हपुरी जिल्हा घोषित करावं या मागण्याघेऊन माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या समन्वयातून व विनोदभाऊ झोडगे मुख्य जिल्हा निमंत्रक यांच्या नेतृवात ब्रम्हपुरी जिल्हा संघर्ष समतीने राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी 19 सप्टेंबर 2024 रोजी भेट घेतली.
या वेळी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष भागवत सर, प्रशांत घुटके सर, हर्षल निनावे, दीपक नवघडे, मिलिंद भनारे, दत्तू टिकले, सुनिल विखार,निमंत्रक प्राचार्य सुयोग बाळबुधे, साकेत भानारकर, तनय देशकर यासह आदी जिल्हा निर्माण संघर्ष समिती चे पदाधिकारी उपस्थित होते.