✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड :- (दिनांक २० सप्टेंबर) वसंतराव नाईक कृषि महाविद्यालय व उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने .पु ल देशपांडे यांच्या मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या बहारदार पुस्तकाची धुळीव ओळख करून देणारा हास्य स्फोटक दीर्घांक ” मराठी वांग्मयाचा इतिहास “या नाटकाचा प्रयोग तालुक्यातील बिटरगाव येथे २१ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता वसंतराव नाईक कृषि माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रांगणात सादर होणार असून या हास्य स्फोटक नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक प्रा.डॉ.अनिल काळबांडे यांनी केले आहे.
पार्थ थिएटर्स मुंबई निर्मित पु.ल. देशपांडे यांच्या मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या बहारदार पुस्तकाची गोळी ओळख करून देणारा हास्यस्पोटक नाटकाचे लेखक मुकेश माचकर असून सीने अभिनेते मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शक केलेल्या या नाटकात मुंबई येथील अभिनेते श्रेयस वैद्य, धनश्री पाटील, मेहुल भारती, वैदेही करमरकर, प्रियपाल गायकवाड, गौरव कालुष्टे हे सादर करणार आहेत.
सदर नाटकाच्या प्रयोगाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून नाटकाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.
शाळा व्यवस्थापक दादासाहेब डोंगे हे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत तर या कार्यक्रमासाठी बिटरगाव ठाणेदार प्रेम केदार , सरपंच प्रकाश पेंदे , शाळा प्रभारी अनिल चेंडकाळे,पोलीस पाटील नामदेवराव देवकते , डॉक्टर अजय नरवाडे व प्राचार्य डी एम खर्चे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून नाटकाची मेजवानी घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक प्रा. डॉ अनिल काळबांडे, अविनाश खंदारे , अशोक गांजेगावकर, दत्तराव काळे, संतोष मुडे, राजाभाऊ गांजेगावकर, प्रवीण सूर्यवंशी, भीमराव नगारे, संतोष कलाने, सर्जेराव चौधरी, प्रा.डॉ. प्रदीप इंगोले सह दैनिक तालुका पत्रकार संघ यांनी केले आहे.