उमरखेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या उमरखेड तालुका कार्यकारिणीची नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी पत्रकारांची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचे सांगितले. पत्रकारांचे न्याय- हक्क अबाधित राहिले पाहिजेत. यासाठीच ही बैठक उमरखेड येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. पत्रकारांना त्यांच्या कामामध्ये स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा अधिकार असला पाहिजे. पत्रकार हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत कारण ते सत्य शोधण्याचे आणि लोकांना माहिती देण्याचे कार्य करतात याशिवाय सभेत अन्य विषयावर चर्चा करण्यात आली. पत्रकारांना सरकार, व्यापारी संस्था किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या दबावापासून स्वतंत्रपणे काम करता यावे, पत्रकारांना त्यांच्या कामामुळे धमकी, हिंसा किंवा अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांची शारीरिक आणि मानसिक सुरक्षा राखणे आवश्यक आहे, पत्रकारांना सार्वजनिक माहिती आणि घटनांबद्दल योग्य ती माहिती मिळवण्याचा आणि ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार असावा, पत्रकारांवर चुकीच्या कारणांमुळे कारवाई होणार नाही याची काळजी घेणे, ते त्यांच्या कामामध्ये कायद्याने संरक्षित असावेत, जर एखाद्या पत्रकारावर आरोप केले गेले असतील, तर त्यांना योग्य न्यायालयीन प्रक्रिया मिळावी आणि त्यांचे हक्क अबाधित राहावेत.
पत्रकारांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर हल्ला किंवा चुकीचे आरोप झाले तर त्यांना न्याय मिळवून देणे हे संघटनेचे काम असेल. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी केले. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास हीगोंलकर, मैनोदीन सौदागर, तालुका अध्यक्ष प्रेम कुमार भारती, उपाध्यक्ष शिवाजी देवसरकर, ज्ञानेश्वर राठोड, बाबा खान, पंकज गोरे, नागेश रातोळे, संजय जाधव, गजानन आजेगावकर, प्रविन कनवाळे, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश कांबळे, गजानन नावडे, रमजान शेख इरफान यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.