बक्षीस मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते – ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते – बी.आर.महाजन विजयी स्पर्धकांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देऊन क्रांतिची सुरूवात !.. – आबासाहेब राजेंद्र वाघ

10

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव – शहरातील नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर येथे गणेशोत्सव निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या समारंभाचे प्रास्ताविक एस एन कोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शहरातील ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, बी.आर. महाजन, ध.ता.अ.पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, तालुकाध्यक्ष धर्मराज मोरे, शहराध्यक्ष प्रभुदास जाधव, अविनाश बाविस्कर उपस्थित होते. सर्व सन्माननीय प्रमुख अतिथींना शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे अनमोल ग्रंथ व शाल देऊन स्वागत करण्यात आले.
कृष्ण गीता नगर येथे गणेशोत्सव निमित्त संगीत खुर्ची, चित्रकला, रंगभरण, निबंध, वकृत्व, डान्स, वेशभुषा, क्रिकेट, व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य कंपास पेटी, पॅड, पेन, पेन्सिल, स्केचपेन, लेखन साहित्य, व महापुरुषांचे व महामातांचे अनमोल ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, बी आर महाजन व आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना स्पर्धेचे महत्त्व सांगून असेच यश मिळवत रहा आणि आपल्या आई – वडीलांचे व कॉलनीचे नाव मोठे करा यासंह पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष जे एस पवार यांनी विजयी स्पर्धकांना मिळालेले महापुरुषांचे ग्रंथ हे अनमोल आहेत ग्रंथ वाचून आपण महापुरुषांना खऱ्या अर्थाने आदरांजली देऊन त्यांच्या विचारांवर चालू शकतो. ग्रंथ हे दिशादर्शक असतात. याप्रसंगी कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, सदस्य प्रल्हाद विसपुते, भरत पाटील, संजय मिस्तरी, बाळू अत्तरदे, संजय सुतार, अमोल धनगर,मनोहर बन्सी, जगन्नाथ भोई, अनिल कुलट, निलेश कुलट, निलेश गुरव, राजेंद्र भोई, गोकुळ महाजन, विनोद सैनी, उदय मोरे, ज्ञानेश्वर पवार तसेच कॉलनीतील सर्व महिला मंडळ व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कॉलनीचे सदस्य पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हर्षल पाटील, रोहन पवार, रोहित सैनी, मनिष सैनी तसेच सर्व कॉलनीवासीयांनी अनमोल सहकार्य केले.