पात्र असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक दिव्यांग लाभापासून वंचित ? -रोशन ढोक बनले दिव्यांगांसाठी श्रावण बाळ

37

सहसंपादक//उपक्षम रामटेके 📱9890940507

समजा मध्ये अनेक नागरिक आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहेत असेच अनेक प्रकाराच्या आजाराने दिव्यांग झालेले लाभार्थी पात्र असूनही दिव्यांग प्रमाणपत्रापासून आर्थिक परिस्थितीमुळे वंचित होते मात्र या दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांना शंकरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते रोशन ढोक यांनी स्वतःच्या खर्चाणे बुधवारी चंद्रपूर येथे जिल्हा शल्यचिकित्सकाकडे नेऊन त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र काढून दिले त्यामुळे या दिव्यांग व्यक्तीसाठी रोशन ढोक श्रावण बाळ ठरले आहेत
चिमूर तालुक्यातील आंबोली गावातील सहा व्यक्ती अनेक दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले होते मात्र अपंग प्रमाणपत्रासाठी पात्र असूनही आर्थिक परिस्थितीमुळे व प्रॉपर मार्गदर्शना अभावी दिव्यांग प्रमाणपत्रा पासून वंचित राहिले होते तर दिव्यांग असूनही प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या दिव्यांगांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजनेपासून वंचित राहावे लागत होते.
अचानक आंबोली गावात काही कामासाठी माजी पस उपसभापती व सामाजिक कार्यकर्ते रोशन ढोक यांना हि अडचण गावातील कवडू झोडापे व एका लकवाग्रस्त रुग्णाने सांगितली तेव्हा रोशन ढोक यांनी कुठलाही विलंब न करता बुधवारी साठगाव येथील उपसरपंच प्रीती दिडमुठे यांच्या मदतीने आंबोली येथील नामदेव कावळे, तुळशीराम गजभे, अंजु विनायक देशकर, नंदिनी डोये, कल्याणी लाकडे,देवानंद चाचरकर व रोहन मोरे या दिव्यांग लाभार्त्यांना स्वतःच्या खर्चाने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शल्यचिकित्सक यांच्या कडून त्या दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिले त्यामुळे अनेक वर्षांपासून दिव्यांग असूनही आर्थिक परिस्थितीने साधे प्रमाणपत्र काढू शकले नव्हते त्यामुळे पात्र असूनही त्यांना शासनाच्या अनेक योजना पासून वंचित रहावे लागत होते मात्र या दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याने हे दिव्यांग आता शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन त्यांना आपले जीवन स्वावलंबी बनून जगण्यास मदत होणार आहे तर या दिव्यांगासाठी शंकरपूर येथील रोशन ढोक श्रावण बाळ ठरल्याची प्रतिक्रिया लकव्याने ग्रस्त असलेल्या नामदेव कावळे यांनी लोकमत जवळ व्यक्त केली आहे.