✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड :- (दि. २५ सप्टेंबर)
सकल मराठा समाज उमरखेड च्या वतीने दी.२४ रोजी विश्रामगृह उमरखेड येथे समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू असून आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचे मागील ९ दिवसापासून उपोषण सुरू आहे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे तरी देखील सरकार दखल घेत नसून आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज दि.२६ गुरुवार रोजी उमरखेड शहर व तालुका बंदचे नियोजन करण्यात आले आहे.
मागील एक वर्षापासून मराठा आरक्षण आंदोलन महाराष्ट्रात पेटते आहे मनोज जरांगे पाटील यांचा लढा कायम सुरू असूनही सरकार केवळ वेळ काढून पणा करत आहे सगे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनीच काढली मात्र त्यावर आता अंमलबजावणी करायसाठी सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकार राजकारण करत आहे व जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम सरकार करीत असून या शासनाच्या भूमिकेचा सकल मराठा समाज उमरखेड च्या वतीने निषेध करून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आज २६ रोजी उमरखेड तालुका व शहर बंदचे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले या संदर्भात काल दिनांक २५ रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय कार्यालय उमरखेड व पोलीस स्टेशन उमरखेड यांना समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले या यावेळी सकल मराठा समाजाचे संपूर्ण समन्वयक व मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे समाज बांधव उपस्थित होते.
—-
मागील एक वर्षापासून सरकारकडून ज्या पद्धतीने आरक्षणाचा मुद्दा लटकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि आता सामाजिक तेढ निर्माण करून जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचा जो किळसवाणा प्रकार सरकार कडून सुरू आहेतो निषेधार्य आहे. – स्वप्निल कनवाळे समन्वयक सकल मराठा समाज उमरखेड