महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा !… सत्यशोधक समाजाचे कार्य प्रेरणादायी – एच डी माळी

85
Advertisements

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २४ सप्टेंबर सत्यशोधक समाज स्थापना दिन व छत्रपती शिवराय शाक्त राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले प्रस्ताविकात पाटील यांनी सत्यशोधक समाज स्थापना दिनाला १५१ वर्ष तर शाक्त शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्ष पूर्ण होत असून या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एम बी मोरे होते मान्यवरांच्या हस्ते कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय व आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले या गुरू -शिष्यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक एच डी माळी व व्ही टी माळी यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य मूलतत्त्वे विद्यार्थ्यांना विस्तृतपणे सांगितले. अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे आहेत. शहरात सत्यशोधक समाज संघ धरणगाव च्या वतीने सत्यशोधक झेंड्याची निघालेली मिरवणूक ही धरणगाव वासियांसाठी प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एम बी मोरे यांनी छत्रपती शिवराय व राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले या महापुरुषांचे कार्य सूर्यासारखे तेज असून आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे असे प्रतिपादन मोरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशिल शिक्षक पी डी पाटील व आभार एस एन कोळी यांनी मानले.