गावंडे महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ संपन्न

25
Advertisements

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. २४ सप्टेंबर) येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही. एस. इंगळे होते व प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा.अभय जोशी उपस्थित होते.

२४ सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ म्हणून देशात सर्वत्र साजरा केला जातो.

राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणते, म्हणून विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, सेवा आणि श्रमाचा संस्कार राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये होतो, असे प्रतिपादन प्रा. अभय जोशी यांनी केले.

तर अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. डॉ. व्ही. एस. इंगळे यांनी जीवनात संस्कारांचे खूप महत्त्व असून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार होतात,
असे सांगून विविध उदाहरणे देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

वरिष्ठ महाविद्यालयातील मागील दोन वर्षांतील उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी अमित अरुण केंद्रेकर, कांचन गजानन जाधव, वैभव वाघ, योगेश बुरकुले, निकेश वानोळे व रितेश माने यांना पारितोषिक व प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईश्वरी झांबरे या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले.

प्रास्ताविक प्रा.साधना देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी कदम हिने केले तर आभार आकाश जळके या विद्यार्थ्याने मानले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बा. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. एस. एस. इंगळे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन ठाकरे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.