“म्हसवड शहर आपले सरकार ” व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

202
Advertisements

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड : म्हसवड शहरातील “म्हसवड शहर आपले सरकार” या व्हाट्स अप ग्रुपच्या वतीने समाजात जनजागृती साठी शोशल मिडीयाचा वापर कसा करावा ? वाॅटसॲप ग्रुप ” च्या माध्यमातून काय केले पाहिजे ?हे दर्शविण्यासाठी फारूक हिदायतुल्ला काझी ( म्हसवड शहर काझी व म्हसवड शहर आपले सरकार ग्रुप चे व्यवस्थापक ) यांच्या विचार श्रेणीतून मासाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थी आणि गावातील नागरिकांचे आरोग्य शिबीर संपन्न झाले यांस नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
“म्हसवड शहर आपले सरकार ” या ग्रुपच्या माध्यमातून प्रति वर्षी एक सामाजीक व धार्मिक सलोखा ठेवण्याचे उपक्रम राबविण्याचे काम करण्यात येत असते त्याचाच एक भाग म्हणून चालू वर्षी दि. 24/09/2024 मंगळवार रोजी
ईद -ए- मिलाद ( पैगंबर जयंती ) व अनंत चतुर्थीनिमित्त
” म्हसवड शहर आपले सरकार ”
या वाॅटसॲप ग्रूपच्या माध्यमातून लहान मुलांचे व पालकांचे आणि मासाळवाडी गावातील लोकांचे मोफत आरोग्य रक्त व रक्त गट नियमित (जनरल चेकअप ) तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी गाव मासाळवाडी ( म्हसवड ) येथे ठेवण्यात आले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळालयाचे ग्रुप ऍडमिन फारुख काझी यांनी सांगितले
शिबिराचे महत्त्व सांगण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम ग्रुप चे सदस्य मा.श्री.राकेश ओतारी ( मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मासाळवाडी ),
मा.श्री.डाॅ.आबाजी सरगर
यांनी आपले आरोग्य कसे सांभाळले पाहीजे स्वच्छते विषयी माहीती दिली.
आरोग्य तपासणी साठी ग्रुप चे सदस्य मा.श्री.डाॅ.भरत काकडे
(बी.ए.एम.एस ),मा.श्री.डाॅ.आबाजी सरगर ( एम.डी.बालरोग तज्ञ),
मा.श्री.डाॅ प्रतिक खोत( एम.एस.जनरल सर्जन),
डाॅ.कु.प्रतिक्षा ओतारी (बी.ए.एम.एस ),मा.श्री.अजित लिटे( आरोग्य सहाय्यक),
औषधोपचारा साठी श्रीमती नाडेकर मॅडम ( आरोग्य सेवीका),
रक्त व रक्त गट तपासणी साठी
सौ.श्रद्धा सुरज करमाळकर ( उपप्राचार्य माणगंगा पॅरामेडिकल काॅलेज ), श्रीमती रसिका गुंजाणे मॅडम,माणगंगा पॅरामेडिकल काॅलेज चे विद्यार्थी व विद्यार्थिनी
मोलाचे सहकार्य लाभले
यावेळी मा.डाॅ.श्री.वसंत मासाळ ( संस्थापक माणगंगा पॅरामेडिकल काॅलेज मासाळवाडी )व सौ.सविता वसंत मासाळ ( प्राचार्य माणगंगा पॅरामेडिकल काॅलेज )यांची उपस्थिती होती
या शिबिराला मार्गदर्शक म्हणून
मा.श्री.डाॅ.एल.डी.कोडलकर
( तालुका आरोग्य अधिकारी),
मा.डाॅ.श्री.मारुती झिमल ( प्रगती लॅब म्हसवड)
सहकार्य प्राथमिक शाळा शिक्षक मासाळवाडी
श्री.राम साळुंखे सर
श्रीमती कमल माने मॅडम
श्री.विष्णूदास बिराजदार सर
श्रीमती कुसुम मासाळ मॅडम -अंगणवाडी सेविका
श्रीमती लोखंडे मॅडम माणगंगा पॅरामेडिकल काॅलेज मासाळवाडी( म्हसवड) यांच्या सहकार्यामुळे हे शिबीर संपन्न झाल्याचे फरख काझी यांनी सांगितले
सदर शिबिरास आर्थिक सहकार्य ग्रुप चे सदस्य मा.श्री वैभव गुरव ( श्री.सिद्धनाथ मंदिर मंदिर पुजारी ) मा.श्री.नामदेव चांडवले
( यशोदा मंगल कार्यालय म्हसवड) यावेळी मान्यवराचा सत्कार ग्रुप ऍडमिन फारुख काझी यांच्या हस्ते करण्यात आला