पुसद च्या को.दौ.विद्यालय मुलींचा फुटबॉल संघ राज्यस्तरावर!

111

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद – बुलढाणा येथे पार पडलेल्या शालेय फुटबॉल कप स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुलींचा संघ विभाग स्तरावर अंतिम सामना जिंकून राज्यस्तरासाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात बुलढाणा संघाला 4- 0 अशा फरकाने धुळ चाळात को.दौ. विद्यालयाने एकतर्फी बाजी मारली.
विजयी संघातील टीम कॅप्टन मानवी मुखरे समृद्धी देशमुख जान्हवी कदम दिपाली आऱ्हडे
आर्या यंबल श्रावस्ती वाढवे श्रेया गारोळे रिद्धी जाधव काव्य सोनटक्के भाविका राठोड नव्या चंदन रितिका कांबळे राशी गुप्ता हर्षदा लेवेकर कीर्ती खंदारे वैष्णवी सुपले श्रेया कनोजे व गौरी यादव याखेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.विभाग स्तरावर जिंकल्या मुळे शाळेचा संघ राज्यस्तरीय स्पर्धे साठी पात्र ठरला आहे..

शाळेचे क्रिडा शिक्षक व प्रशिक्षक सुधीर राठोड सर व विजय चव्हण सर यांचे अभिनंदन शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.रिता बघेल गजानन वायकुळे पर्यवेक्षक मनोज नाईक अनंत जाधव व बलराम मुराडी यांनी केले व संस्थेच अध्यक्ष राजू कोटलवार व सभापती डॉ.आनंद मुखरे यांनी राज्यस्तरावर उत्कृष्ठ कामगिरी साठी शुभेच्छा दिल्या.