डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांची 99 वी जयंती संपन्न

148

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

 

ब्रम्हपुरी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा ब्रह्मपुरी द्वारे अभिवादन तथा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा ब्रह्मपुरीचे अध्यक्ष मान. मारोतरावजी कांबळे साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांची प्रमुख उपस्थिति लाभली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. जयंतकुमार रामटेके विचार मंचावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मान. मारोतरावजी कांबळे यांनी बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सोबत व्यतीत केलेल्या सुवर्णमय प्रसंगाना उजाळा दिला.

प्रा . जयंतकुमार रामटेके यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवन आणि सर्वांगीण कार्यावर प्रकाश टाकला.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे यांनी राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार तेजस्विनी चुणारकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ब्रह्मपुरी, बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे बी.एड. कॉलेज, मिराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज, आणि ब्रह्मपुरी पब्लिक स्कूल येथील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तथा रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.