धनस्मृती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांचे विरोधात कामगाराचे बेमुदत आमरण उपोषण -चार लाख रुपये कंपनीने न दिल्याचा आरोप

148

 

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो.8888628986

 

भंडारा:- उपोषणकर्ते संजय हरिदास नागदेवे हे धनस्मृती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांचे काम कारधा पोलीस स्टेशन येथे सुरू असताना यांच्याकडे काम केले आहे. त्यांनी उपोषणकर्ते नागदेवे यांची कामाची रक्कम न दिल्यामुळे दिनांक १२/०८/२०२४ पासून जिल्हाधिकारी जिल्हा कार्यालय भंडारा समोर बेमुदत आमरण उपोषणावर बसले होते. त्यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त भंडारा येथील फंड साहेब आणि इतर कर्मचारी तसेच धनस्मृती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शहाजी महादेव जोंधळेकर हे उपोषण मंडपी आले आणि त्यात चर्चा करून उर्वरित रक्कम साडेचार लाख रुपये नागदेवे यांना देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार त्यांनी नागदेवेना त्याच वेळी पन्नास हजार रुपये बँकेत पाठविले असून उर्वरित चार लाख रुपये दि. १५ सटेंबर २०२४ पर्यंत देण्याचा लेखी करारनामा करून दिला त्यासोबत बँकेचे चेक क्र. ५०९३५४ ऐक्सिस बैंक कल्याण नगर पुणे व्हॅट्सऍपवर पाठविला आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत चार लाख रुपया पैकी एक रुपया पाठवलेले नाही. त्यामुळे पीडित संजय नागदेवे यांनी अनेकदा गैरअर्जदार यांना फोन केले असून उडवा उडविची उत्तर गैरअर्जदार कडून मिळाले तेव्हा नागदेवे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येत असल्यामुळे न्याय मागणीसाठी दिनांक २६ सटेंबर २०२४ सा सकाळी ११ वाजता जिल्हा अधिकारी साहेब जिल्हा कार्यालय भंडारा समोर न्याय मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणावर बसले आहेत. धनस्मृति बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर्फे शहाजी महादेव जोंधळेकर यांनी पीडित संजय नागदेवे यांची आर्थिक
फसवणूक केली असून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून पीडित उपोषणकर्ते संजय नागदेवे यांच्या कामाचे कष्टाचे मेहनतीचे चार लाख रुपये कंपनीकडून वसूल करून देण्यात यावे व उपोषणकर्तेच्या जीवाला कमी जास्ती झाल्यास याची सर्व जबाबदारी शासन व संबंधित अधिकारी यांची राहील. या संदर्भात दि. २३/००१/२०२४ रोजी विनंती पत्र दिले असून सहायक कामगार अधिकारी श्री फंड यांच्याशी उपोषणकर्ते भेटले परंतु न्याय न मिळाल्याने दि. २६/०९/२०२४ ला सकाळी ११ वाजपासून जिल्हाधिकारी जिल्हा कार्यालय भंडारा समोर न्याय मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणावर संजय नागदेवे बसले आहेत. लवकरात लवकर संबधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी उपोषणकर्त्याची मागणी आहे.