जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेला प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

81

 

 

 

जळगाव – माहेश्वरी महिला संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सुनिताजी पलोड, प्रदेश संघटन मंत्री सरोजजी तोषणीवाल, खान्देश विभाग उपाध्यक्ष कल्पनाजी लोया ह्यांनी पाळधी (ता. धरणगाव) ला सदिच्छा भेट दिली. उषा कासट व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर प्रदेश पदाधिकाऱ्यांनी जळगावला भेट दिली. प्रथम जिल्हा संघटनेकडून दोन गरजू महिलांना शिवण व पिको फॉल मशिन त्यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांचे स्वागत संघटनेच्या अध्यक्ष सुमती नवाल, सचिव मनिषा तोतला व सर्व कार्यकर्त्यांनी केले.

त्यानंतर अध्यक्षा सुमती नवाल व सचिव मनिषा तोतला ह्यांनी संघटनेचा कार्यवृत्तांत सादर केला. प्रदेशच्या पाधिकाऱ्यांनी नेत्याला आवश्यक असलेले नेतृत्व गुण, संघटनेचे महत्त्व व ट्रस्टविषयी सविस्तर माहिती दिली.
ह्याच सभेत महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्या माजी अध्यक्षा व सर्व सदस्यांच्या आवडत्या आदरणीय ज्योत्स्ना लाहोटी ह्यांना त्यांच्या प्रदीर्घ समाजसेवेबद्दल जिल्हा संघटनेकडून नारी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्योत्स्ना लाहोटी ह्यांच्या स्वभावगुणांबद्दल संघटनेच्या अध्यक्षा सुमती नवाल ह्यांनी माहिती दिली. नारी रत्न पुरस्काराचे वाचन मनिषा तोतला ह्यांनी केले. ज्योत्स्ना लाहोटी ह्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या मनोभावना थोडक्यात व्यक्त केल्या व आपल्याला मिळालेला पुरस्कार आपल्या सहकार्यांना समर्पित केला व यापुढेही सर्वांच्या सहकार्याने असेच कार्य करीत राहण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, अनेकांनी त्यांच्या सोबत फोटो काढून घेतले. हा कार्यक्रम बघण्यासाठी ज्योत्स्ना लाहोटी ह्यांचा परिवारही उपस्थित होता.
यासोबतच जिल्ह्यातील 20 प्रभावशाली महिलांनाही गौरविण्यात आले. गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला गेला. आभार प्रदर्शन संगिता चांडक ह्यांनी केले. सूत्र संचालन निधी भट्टड व राणी लाहोटी ह्यांनी ओघवत्या शैलीत केले. या भावस्पर्शी कार्यक्रमाला जिल्हा सभेचे बरेच पदाधिकारी व महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.