आता तालुका स्तरावर पेटी व डिनर सेट संचांचे होईल वाटप

151

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

यवतमाळ:- (दिनांक २८ सप्टेंबर) इमारत बांधकाम कामगार यांच्या लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व

बांधकाम कामगारांना सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई मार्फत यवतमाळ जिल्ह्यातील नोंदीत जीवित पात्र बांधकाम कामगारांना संबंधित कंपनीकडून सुरक्षा संच व अत्यावश्यक संच (पेटी) तालुकास्तरावरील शासकीय जागेच्या ठिकाणी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळामध्ये नोंदित जीवित पात्र कामगारांची (नोंदणी दिनांक नुसार) यादी तयार करण्यात पात्र बांधकाम कामगारांना ९५२९८१४१४९ वरून स्तरावरील नियोजित दिनांकास बोलवण्यात येईल सकाळी १०.०० वाजता मंडळाच्या संबंधित मूळ आली आहे. नोंदीत जीवित ९५२९८०६९१२ व संपर्क साधून तालुका शासकीय जागेवर ज्या त्या दिवशी सदर ठिकाणी स्वतः बांधकाम कामगाराने कागदपत्रांसह उपस्थित राहून सर्वप्रथम बायोमेट्रिक करून घ्यावे तदनंतर सुरक्षा संच व अत्यावश्यक संच प्राप्त करून घ्यावे. उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावरून संपर्क करण्यात येईल अशाच कामगारांनी सुरक्षा संच व अत्त्यावश्यक संच (पेटी) वाटप ठिकाणी उपस्थित रहावे, कायदा व सुव्यवस्था अबादित राहील याची दक्षता घ्यावी.

सदरची मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रयस्थ व्यक्तीद्वारे आपली दिशाभूल/फसवणूक करण्यात येत असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करावी. अशी

नोंदणी दिनांक नुसार होणार वाटप, ज्यांना बोलल्या जाईल त्यांनीच येण्याचे केले आव्हान
विनंती सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, यवतमाळ द्वारे करण्यात येत आहे.