✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो. 9823995466
उमरखेड (दिनांक २९ सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी अमरावती दौऱ्यावर होते.
दौऱ्या दरम्यान अमरावतीच्या नियोजन भवन येथे अजित पवार यांच्यासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व अपंग बांधवांनी आपल्या मागण्यांची निवेदन अजित पवार यांना दिले. या मागणीच्या निवेदनात निवडणुकीत दिव्यांगांना दोन टक्के राजकीय आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी होती.
यावेळी अजित पवार यांनी सदर मागणी संदर्भात दिव्यांगाना उत्तर देताना दिव्यांगांना आरक्षण देऊन आम्ही काय खुरपणी करायला जायचं का ?
दिव्यांगांना राजकीय आरक्षण ? असे बेताल वक्तव्य अजित पवार यांनी केले. सदर वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत आहे.
या वक्तव्यामुळे दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ उमरखेड येथील माहेश्वरी चौक या ठिकाणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या कार्यकर्त्यांच्या व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करीत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुकाप्रमुख बालाजी माने, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहर प्रमुख प्रेम रुडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा प्रमुख बंडु हामंद,आशिष हामंद, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार, प्रवीण इंगळे ( प्रहार जनशक्ती पक्ष बाळदी प्रमुख ) शाम चैके,आभिजित गंधेवार,नारायण भवर,केतन वानखेडे,नितिन टिंगरे,महम्मद आयुब,शेख ईनायत,बंडु सुकळकर,शेक सिद्दिक,केरबा कावडे, शेख,बजरंग पवार,सिद्धार्थ मुनेश्वर, रघुनाथ खंदारे, मुजिब, प्रविण इंगळे, बालाजी भोयर, सुंदरम पिंनलवार,संघपाल पाईकराव,बाळु भदाडे,पिंटू पवार,दत्ता पवळे,मारोती देवकते, दत्ता पवार यांच्यासह तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
—
– अजित पवार यांनी जाहीर माफी मागावी -बालाजी माने.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असणारे अजित पवार यांनी समस्त भारतातील व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या विरोधात जे वक्तव्य अमरावती येथील नियोजित भवनांमध्ये दिव्यांग बांधवांसमोर केले त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आहो. अजित पवार यांनी दिव्यांग बांधवांची माफी मागावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुकाप्रमुख बालाजी माने यांनी व्यक्त केले.