महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामस्वच्छता व अस्पृश्यता निवारण विषयावर कार्यक्रम घ्यावेत-विजयकुमार भोसले

99
Advertisements

 

 

 

हातकणंगले(कोल्हापूर )-राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिप्रेत असलेला समाज व देश घडविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत, गांधींजीनी आपल्या संपूर्ण जीवनकाळत समाज परिवर्तनकरिता विविध कृतिशील कार्यक्रम दिलेत, त्यातील ग्रामस्वछता व अस्पृश्यता निवारण हा अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम आहे, येत्या 2 ऑक्टोंबर रोजी कांग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वत्र या विषयावर कृतिशील कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग राज्य सचिव तथा सातारा जिल्हा प्रभारी विजयकुमार भोसले यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्य बापूंचे प्रिय कार्य ग्रामस्वच्छता व अस्पृश्यता निवारण या उपक्रमात नागरिक स्वयंस्फूर्ती सहभागी होतील असा विस्वास भोसले यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधीजींच्या पुण्यस्मृतींना उजाळा देऊन त्यांचे प्रिय कार्य करण्यासाठी सर्व ग्रामस्थ बांधवांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवावा व सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात हा कार्यक्रमाचे नियोजन करून बापूजींच्या आदरांजली अर्पण करण्यात यावी असे नम्रतापूर्वक आवाहन विजयकुमार भास्कर भोसले यांनी केले.