परमानंद जेंगठे झाडीबोली शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित

264

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी- झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे, बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे, लिहित्या हाताना बळ मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे झाडी शब्दसाधक पुरस्कार दिले जातात. यावर्षी जिल्ह्यातील प्रतिभावंत बोली साहित्यिकांची निवड केली. त्यामध्ये मूल तालुक्यातील परमानंद जेंगठे यांना शब्द साधक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात विषय शिक्षक म्हणून कार्यरत राहून आजवर अनेक विषयाला हात घालीत काव्यरचना व प्रबोधनात्मक लेख लिहून सामाजिक जागृती केली आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा ब्रम्हपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हॉल येथे रीताताई उराडे माजी नगराध्यक्ष ब्रह्मपुरी, एड. लखनसिंह कटरे केंद्रीय सदस्य, डॉ. धनराज खानोरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर चंद्रपूर , प्राचार्य देवेंद्र कांबळे, कुंजीराम गोंधळे जिल्हाध्यक्ष भंडारा, पवन पाथोडे जिल्हाध्यक्ष गोंदिया, प्रा .विनायक धानोरकर, जिल्हाध्यक्ष गडचिरोली, प्राचार्य रत्नमाला भोयर तसेच इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सोहळा पार पडला.
या झाडी शब्दसाधक पुरस्कार मिळाल्याने परमानंद जेंगठे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.