“संविधानिक मूल्यांची पायमल्ली रोखावी लागेल !” – सिनेअभिनेते किरण माने

11

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड : स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकतंत्र या आदर्श मानवी मूल्यांची सातत्याने पायमल्ली होताना दिसत आहे. अशावेळी देशाच्या जडणघडण आणि एकात्मतेसाठी आधार ठरलेल्या संविधानाच्या संवर्धनासाठी देशवासीयांनी भूमिका घेण्याचे आवाहन प्रसिद्ध सिने अभिनेते किरण माने यांनी केले.
संविधानवादी संघटनांच्या वतीने आयोजित जिल्हा क्लस्टर अधिवेशनप्रसंगी उद्घाटक म्हणून माने बोलत होते.
अध्यक्षस्थानी संविधान अभ्यासक डॉ विनोद पवार हे होते.
माने पुढे म्हणाले की, संविधान देशाला सुपूर्द करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले इशारे आपण विसरून आनंदाच्या डुलक्या घेत बसलो. प्रत्येक क्रांती नंतर विषारी साप तात्पुरते बिळात बसून संधीची वाट पाहतात. आम्ही त्यांच्या दंशाने जागे झालो आहोत.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ विनोद पवार यांनी संविधान बदलू पाहणाऱ्यानी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकतान्त्रिक व्यवस्थेला पर्याय देण्याची हिम्मत दाखवावी असे आवाहन केले.
दुसऱ्या सत्रात प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे, प्रा डॉ श्यामसुंदर मिरजकर, महादेव भोकरे, भरत लोकरे, प्रकाश खटावकर, यांनी मनोगते व्यक्त केली. दुसऱ्या सत्राची अध्यक्षता एम डी चंदनशिवे यांनी केली.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुशांत गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन आभार कैलास तोरणे , लक्ष्मण मोहिते यांनी केले.
कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून बहुसंख्य संविधानवादी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी भारत सावंत,हणमंत सकलावे, संभाजी सावंत, गणपत भालेकर, विठ्ठल जाधव इत्यादींनी परिश्रम घेतले.