डॉ. विश्वास सुतार यांचा बुधवारी सत्कार

307
Advertisements

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत,
गायक आणि संगीतकार डॉ. विश्वास सुतार यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची मराठी विषयातील विद्यावाचस्पती (Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सन्मानाची पदवी प्राप्त केल्याबद्दल बुधवार दि. 2 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 11:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी निर्मिती विचारमंच, महात्मा गांधीजी नवविचारमंच, निर्मिती प्रकाशन, संवाद प्रकाशन, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती फिल्म क्लब या संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित केला आहे. सत्कार समारंभाचे आयोजन अनिल म्हमाने, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा चाळके, अ‍ॅड. करुणा विमल, विश्वासराव तरटे, अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले असून सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.