आकाश विद्यालय मेंढा ( ख )चे सुयश

94

 

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी :- आकाश विद्यालय मेंढा (ख). ता. नागभीड जि. चंद्रपूर या शाळेचां दिवसेंदिवस तालुक्यात नाव लौकिक वाढत चालला आहे. शाळेनि गुणवत्ते सोबतच विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश प्राप्त केलेला आहे.
‘सारथी’ या राज्य सरकारच्या संस्थेद्वारा घेतलेल्या ‘ राजश्री शाहू महाराज’ निबंध लेखन स्पर्धेत नागभीड तालुक्यातून ‘माध्यमिक गटात’ कु. कृतिका राजेंद्र लडके वर्ग 10 वि या विद्यार्थिनी ने ‘प्रथम क्रमांक’ मिळवून आकाश विद्यालयाचे नाव बुलंद केले आहे . तर नुकत्याच पार पडलेल्या ‘ कला महोत्सव’ या अंतर्गत कू. अश्विनी दिलीप खुळशिंगे वर्ग 11वी या विद्यार्थिनीनें ‘एकल नृत्य’ प्रकारात तालुक्यात’ ‘प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याच्या कला महोत्सवात नागभीड तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे. या दोन्ही मुली नागभीड तालुक्यातून प्रथम आलेले आहेत हे विशेष.
आकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. वाय. कोरे सर यांनी या यशाबद्दल सदर विद्यार्थिनींचे अभिनंदन केले असून मेंढा हे ग्रामीण क्षेत्र असूनही शहरातील मोठ्या शाळांच्या तुलनेत आपले विद्यार्थी सुद्धा कुठेही कमी नाहीत याचा हा पुरावाच आहे . असे प्रसंशोदगार काढले. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रत्येकी क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना 1001 रू. चे रोख पारितोषिक प्रदान करून शाळा स्तरावर जाहीर सत्कारही केला . या यशामागे विद्यालयाच्या शिक्षिका कु. गोहने,कु. कुंभलवार सौ. जगनाडे, श्रीमती भांडारकर, कु. मडावी तसेच शिक्षक श्री. गडपायले श्री कोहाडे , श्री परशुरामकर , श्री मडावी , मयूर मेश्राम यांचे परिश्रम व मार्गदर्शन यांच्याही वाटा आहे असे भरभरून कौतुक केले.