” जिजामाता माध्य.शाळा व क.म.वि मध्ये शारदामातेची स्थापना “

48

 

मोर्शी (प्रतिनिधी ) :
येथील विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला ता.मोर्शी द्वारा संचालित जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,मोर्शी येथे दि.३ऑक्टोबर २०२४ रोजी शारदामातेची स्थापना सौ.विमलाताई विकासराव ठाकरे (उपाध्यक्षा, विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था,येरला), सौ.शोभाताई सुहासराव ठाकरे(कार्यकारिणी सदस्या,विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था,येरला.),
यांच्या शुभहस्ते झाली.प्रमुख अतिथी श्री विकासराव ठाकरे (सचिव,विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था,येरला.),सौ.शुभांगी जयंतराव सराटकर(कार्यकारिणी सदस्या,विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला.),प्राचार्य श्री सुधीरकुमार सवाई होते.याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
दि.४ ऑक्टोबर २०२४ रोजी रांगोळी स्पर्धा व आरती सजावट स्पर्धा मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आली.या स्पर्धेनंतर प्राचार्य श्री सुधीरकुमार सवाई यांच्या अध्यक्षतेत ” माता पालक मेळावा ” घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ.माधुरी मंगेशसिंह गहरवार,सौ.सुरेखा गजाननराव राऊत,सौ.रंजना निलेशराव फुके, सौ.पद्मा ज्ञानेश्वरराव भड या होत्या.
माता पालक मेळाव्याचे प्रास्ताविक श्री भुजंगराव भारती सर,संचालन श्रीमती प्रेमलता विरखरे मॅडम तर आभार श्रीमती अजमिरे मॅडम यांनी मानले.या कार्यक्रमाला बहुसंख्य माता-पालक वर्ग उपस्थित होता तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता
अल्पोपहाराने झाली.
दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी ” आरोग्य मार्गदर्शन ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रमुख वक्त्या समुपदेशक डॉ.सौ.प्रतिभा घाटोळ यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना निरोगी आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सुधीरकुमार सवाई होते.अध्यक्षीय भाषणात त्यांनी ” विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आरोग्य विषयक मार्गदर्शन आचरणात आणून स्वतःचे आरोग्य निरोगी करण्याचे आवाहन केले.”
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. उज्ज्वला ढोकणे मॅडम यांनी केले तर आभार कु.सिमा गाडगे मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी -विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.